वारणा पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:26 AM2021-01-20T04:26:10+5:302021-01-20T04:26:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर.... अतिवृष्टी व कोरोना महामारीच्या संकटात वारणा दूध संघाने धाडसाने तोंड देऊन प्रगतीकडे वाटचाल ठेवली आहे. ...

Warna Veterinary College to be set up | वारणा पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार

वारणा पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर....

अतिवृष्टी व कोरोना महामारीच्या संकटात वारणा दूध संघाने धाडसाने तोंड देऊन प्रगतीकडे वाटचाल ठेवली आहे. वारणा दूध संघामार्फत लवकरच पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबरोबर जनावरांच्या उपचाराची अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. अडचणीच्या काळात बिहार दूध संघाला वारणेने संक्रातीला सुमारे ८१ लाख लिटर दुधाचा पुरवठा केला असून कोरोनाकाळात देखील ८८७ कोटींची वार्षिक उलाढाल केली असल्याचे अध्यक्ष कोरे यांनी सांगितले.

तात्यासाहेब कोरेनगर येथे वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर मंगळवारी ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

प्रारंभी संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले.

यावेळी कोरे म्हणाले, संघाच्या कॅडबरी विभागाने ९,६९५ इतके टन बोर्नव्हिटाचे उत्पादन घेतले. या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून १० हजार कोटींचा विस्तारित प्रकल्प लवकरच सुरू करणार असल्याचे अध्यक्ष कोरे यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर, मुंबई, औरंगाबादसह मोठ्या शहरांमधून दूध उत्पादनांची अद्ययावत शॉपी उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांना दूध पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. संघास दूध पुरवठा करणाऱ्या सहकारी दूध संस्थांना ८५ पैशांऐवजी आता १ रुपया कमिशन देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच वारणा दूध संघ व वारणा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, असे कोरे यांनी सांगितले.

विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले. यावेळी सर्व-१३ विषयांसह ऐनवेळचे विषय सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले. सहकार गीत अरुण कुंभार व सहकाऱ्यांनी सादर केले.

व्यासपीठावर वारणा दूध संघाचे सर्व संचालक, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, जि. स. सदस्य अशोकराव माने, शिवाजीराव मोरे, सीए रणजीत शिंदे, पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक एच. आर. जाधव यांनी आभार मानले, तर शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी... तात्यासाहेब कोरेनगर येथे मंगळवारी झालेल्या वारणा सहकारी दूध संघाच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, संचालक एच. आर. जाधव, शिवाजी कापरे, प्रमोद कोरे, उत्तम पाटील, रणजीत शिंदे, अशोकराव माने व संचालक मंडळाची उपस्थिती होती.

(छाया - राहुल फोटो )

फोटो -

Web Title: Warna Veterinary College to be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.