शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागेवर मैदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 20, 2015 23:47 IST

स्वच्छतेत बाजी : बगिचा, मंडई, पोलीस चौकीची सोय नाही

कोल्हापूर : बहुतांश फ्लॅट रहिवाशांचा प्रभाग असलेल्या जरगनगरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भेडसावत असलेले पाणी, ड्रेनेज, गटारी, रस्ते हे प्रश्न सोडविण्यात स्थानिक नगरसेवकांना यश आले आहे. मात्र विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान, मुलांना खेळण्यासाठी व नागरिकांना विरंगुळ्यासाठी बाग, भाजी मंडई अशा सोयी-सुविधा मात्र परिसरात नाहीत. मैदानासाठी महापालिकेने प्रभागातील एका मोठ्या जागेवर आरक्षण टाकले आहे. पण त्यावर पुढील कारवाई न झाल्याने ती जागा ओसाड पडली आहे.जरगनगर या प्रभागात लेआउट नं. १, २, ३, ४ अशाना कॉलनी, रामानंदनगर, जाधव पार्क, गुरुकृपा कॉलनी, मंडलिक पार्क, बळवंतनगर, इंदिरा घरकुल हा परिसर या प्रभागात मोडतो. प्रभागात आता वाढीव संख्या धरून नऊ हजार लोकसंख्या आहे. या परिसरातील बहुतांश भाग हा उच्च-मध्यमवर्गीयांचा आणि फ्लॅट संस्कृतीला आपलेसे केलेल्या नागरिकांचा आहे. पूर्वी हा प्रभाग रायगड कॉलनीला जोडला गेला होता; त्यामुळे बहुतांश कामे रायगड कॉलनीत झाली. परिणामी जरगनगर परिसर पाणी, रस्ते, ड्रेनेज, गटरींसारख्या विकासकामांपासून वंचित राहिला. गेली २० वर्षे राजकारणात असलेले सुनील पाटील यांनी राष्ट्रवादीकडून २०१० साली नगरसेवकपदाची निवडणूक लढविली. मतदानाच्या माध्यमातून नागरिकांनी टाकलेला विश्वास योग्य ठरवीत त्यांनी पहिल्याच वर्षी रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली. महापालिकेचा निधी, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या निधीतूनही प्रभागात विकासकामे झाली आहे. जरगनगर मेन रोड, या परिसराला जोडणारे मुख्य रस्ते, गटर्स, ड्रेनेज लाईन या सगळ्या सोयी प्रभागात आहेत. महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा कुत्सित दृष्टिकोन येथील ‘जरगनगर विद्यामंदिर’ या शाळेने खोडून काढला आहे. या शाळेत सध्या कंदलगाव, पाचगावसह शहरातील विविध भागांतून पंधराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रभागात या सोयीसुविधा असल्या तरी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही. महापालिकेने पाण्याच्या टाकीजवळील जागा त्यासाठी आरक्षित केली आहे. मात्र अजून तिची कार्यवाही केलेली नाही. जागामालक आणि महापालिका यांच्यातील वादाचा फटका येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. शिवाय, परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी एकही बगीचा नाही, भाजी मंडई नाही. भाजी खरेदी करायची असल्यास गावात यावे लागते. परिसरात एक पोलीस चौकी आणि अग्निशमन दलाची सुविधा असावी, या मागणीकडेही महापालिकेने कानाडोळा केला आहे.मानधनातून प्रभागात विकासकामेनगरसेवक म्हणून मिळणाऱ्या मानधनाची रक्कम जमा करून पाटील यांनी प्रभागातील गटारींची कामे पूर्ण केली आहेत. याशिवाय स्वत:च्या खर्चातून कचरा उठावासाठी कर्मचारी नेमले आहेत. आता स्वखर्चातून व लोकसहभागातून लेआउट नंबर २ येथे बागेची उभारणी करण्यात येणार आहे. परिसराच्या स्वच्छतेबद्दल ‘संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानां’तर्गत प्रमाणपत्रही मिळाले आहे.