शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्किट बेंच’च्या निर्णयाची आज दुपारपर्यंत प्रतीक्षा

By admin | Updated: September 7, 2015 22:42 IST

सर्किट बेंचप्रश्नी गेल्या ३० वर्षांपासून लढा सुरू आहे. वकिलांसह पक्षकार बांधवांनी यापूर्वी प्रथम निवेदन, रॅली, मोर्चे, निदर्शने आदी आंदोलने केली आहेत.

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन करावे, या खंडपीठ कृती समितीच्या मागणीवर मुख्य न्यायाधीश मोहित शहा सोमवारी अंतिम निर्णय देण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यताच राहिली असून ते मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पदभार सोडण्यापूर्वी याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यातील वकील या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्किट बेंचप्रश्नी गेल्या ३० वर्षांपासून लढा सुरू आहे. वकिलांसह पक्षकार बांधवांनी यापूर्वी प्रथम निवेदन, रॅली, मोर्चे, निदर्शने आदी आंदोलने केली आहेत. राज्य शासनाने ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्याकरीता कोल्हापुरात स्थापन करण्याबाबत ठराव संमत करूनही केवळ प्रतीक्षाच करावी लागली आहे. १५ आॅगस्टला पक्षकारांनी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाची दखल घेत न्यायाधीश शहा यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीच्या सहा जिल्ह्यांच्या ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली होती. त्यानुसार कृती समितीने ठरावांसह संस्थानकाळातील माहिती संग्रहित करून सादरही केली आहे. न्यायाधीश शहा हे आज, मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यापूर्वी ते सोमवारी सायंकाळपर्यंत ‘सर्किट बेंच’चा निर्णय देतील,अशी अपेक्षा वकीलवर्गाला लागून राहिली होती. मात्र, त्यांनी याबाबत काही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता आज, मंगळवारी न्यायमूर्ती शहा यांनी पदभार सोडण्यापूर्वी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ते याबाबत निर्णय घेतील, अशी अपेक्षा कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील मंडळींना आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही कोल्हापूरला देता तर पुण्याला का नाही, असे म्हणून विरोध केला आहे. त्याचाही परिणाम शक्य आहे. त्यामुळे न्यायमूर्ती शहा हे काय निर्णय घेतात याकडे तमाम वकील मंडळींसह पक्षकारांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)मुख्य न्यायाधीश मोहित शहा आज, मंगळवारी सेवानिवृत्त होत असून त्यांनी सोमवारी याबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. न्यायमूर्ती शहा हे सायंकाळी पाच वाजता पदभार सोडणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ते कोल्हापूरच्या सर्किट बेंचप्रश्नी निर्णय देतील. त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत.- अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष व निमंत्रक, खंडपीठ कृती समिती