शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha2024: मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये झाली सील, उत्सुकता निकालाची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 13:21 IST

मतमोजणी ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून

कोल्हापूर : जिल्ह्यात कोल्हापूरहातकणंगले लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे राजकीय भवितव्य सामावलेली मतदान यंत्रे बुधवारी दुपारी स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद झाली. कोल्हापूर मतदारसंघातील यंत्रे रमणमळा येथे, तर हातकणंगले मतदारसंघातील यंत्रे राजाराम तलाव येथील गुदामात ठेवण्यात आली असून, ते मतमोजणीपर्यंत केंद्रीय पोलिस पथक, एसआरपीएफ व राज्य पोलिसांच्या त्रिस्तरीय सुरक्षेत असणार आहेत. मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल.कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात मंगळवारी मोठ्या चुरशीने व उत्साहाने ७१ टक्क्यांवर मतदान झाले. अनेक केंद्रांवर सायंकाळी ६ वाजून गेल्यानंतरही रात्री ८-९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे लोकप्रतिनिधींच्या उमेदवारांच्या समोर सीलबंद करून विधानसभा मतदारसंघात आणायलाच मध्यरात्र झाली. येथे मतदान यंत्रे स्वीकारल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर त्यांची छाननी झाली, त्यानंतर पहाटे ४ वाजल्यापासून मतदान यंत्रे गुदामाच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली.कोल्हापूर मतदारसंघासाठी मतदान झालेली यंत्रे रमणमळा येथे तर हातकणंगले मतदारसंघासाठी मतदान झालेली यंत्रे राजाराम तलाव येथील गुदामात मतदारसंघनिहाय स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली. शेवटची गाडी सकाळी ६ वाजता दाखल झाली. त्यानंतर छाननी, मतदान यंत्रांची संख्या ही पडताळणी झाल्यावर सकाळी साडेदहा वाजता निवडणुकीसाठी नियुक्त ऑब्झर्व्हर आले. त्यांच्यासमोर सर्व यंत्रांचे सीलिंग करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया व्हायला दुपारचे १२ वाजले.रात्रभर चालली प्रक्रियामंगळवारपासून ते बुधवारी दुपारपर्यंत मतदान यंत्रे सील करणे, त्यांचे संकलन, वाहतूक, गुदामाच्या ठिकाणी ते आणणे, सर्व यंत्रे मिळाल्याच्या नोंदी करणे, छाननी, मतदारसंघ निहाय स्ट्राॅंग रूममध्ये ठेवणे, त्यांचे सीलिंग हे सगळे काम प्रचंड तणावाचे आणि वेळखाऊ असते. निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी रात्रभर याकामात व्यस्त होते. बुधवारी दुपारी १ वाजता सगळे आपापल्या घरी परतले. आता मतमोजणीची तयारी सुरू होणार आहे.

शासकीय कार्यालये ओस..बुधवार दुपारपर्यंत सर्व कर्मचारी मतदान यंत्रांची व्यवस्था लावण्याच्या कामातच व्यस्त असल्याने सर्व शासकीय कार्यालये ओस पडली होती. मोजके कर्मचारी वगळता कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. आज गुरुवारपासून कार्यालयांच्या नियमित कामकाजाला सुरुवात होईल.

आचारसंहितेत सूट नाही..ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले आहे तेथील आचारसंहितेच्या नियमात सूट देण्याचे कोणतेही निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले नाहीत, त्यामुळे कोल्हापुरातील निवडणूक पार पडली असली तरी आचारसंहितेत कोणतीही सूट दिली जाणार नाही. शासकीय कार्यालयांचे नियमित कामकाज, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत कामासंबंधीच्या बैठका सुरू राहतील. मात्र मंत्री, लोकप्रतिनिधींच्या बैठका होणार नाहीत. आचारसंहिता ६ जून रोजी संपेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीनResult Dayपरिणाम दिवस