शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’चे मतदान तालुक्यात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) २ मे रोजी मतदान होत असून, कोविडच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) २ मे रोजी मतदान होत असून, कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात मतदान घेतले जाणार आहे. साधारणत: दीडशे मतांसाठी एक केंद्र अशा सुमारे २३ केंद्रांवर मतदान घेण्याची तयारी निवडणूक यंत्रणेनेे सुरू केली आहे.

राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, त्यात लॉकडाऊनची शक्यता असल्याने ‘गोकुळ’ची निवडणूक कशी होणार, याबाबत उत्सुकता आहे. उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान हाच मुद्दा उपस्थित झाला होता. मतदारांची संख्या कमी असली तरी मतदानावेळी गर्दी होणार नाही, तालुकानिहाय मतदान घेऊन याची दक्षता घेतली जाईल, असे सहकारी निवडणूक प्राधिकरणने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे तालुकानिहाय मतदान होणार आहे. साधारणत: एका केंद्रावर दीडशे मते अशा पद्धतीने २३ केंद्रांवर ही प्रक्रिया होऊ शकते.

लॉकडाऊन झाले तर प्रचाराचे काय?

राज्यातील कोरोनाची स्थिती भयानक असल्याने साधारणत: गुरूवार (दि. १५)पासून संपूर्ण राज्यात कडक लाॅकडाऊनची शक्यता आहे. किमान पंधरा दिवस म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहू शकते. या कालावधीत ‘गोकुळ’ची प्रचार यंत्रणा कशी राबवायची? असा प्रश्न दोन्ही आघाड्यांसमोर आहे. माघारीनंतर ठरावधारकांच्या गोळाबेरजेला वेग येणार असला, तरी लॉकडाऊनचा अडथळा राहणार आहे.

लॉकडाऊन झाले तरी माघारीसाठी यावेच लागणार

लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरु असल्याने ‘गोकुळ’च्या माघारीची प्रक्रिया कशी राहणार? याबाबत उत्सुकता आहे. याबाबत इच्छुक उमेदवार, सूचक किंवा अनुमोदक यापैकी एकाला स्वत: हजर राहून उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.

अशी असू शकतात केंद्र

तालुका मतदान केंद्रांची संख्या

गगनबावडा ७६ १

हातकणंगले ९५ १

शिरोळ १३४ १

आजरा २३३ १

गडहिंग्लज २७३ २

शाहूवाडी २८७ २

चंदगड ३४६ २

पन्हाळा ३५३ २

भुदरगड ३७३ २

कागल ३८३ २

राधानगरी ४५८ ३

करवीर ६४१ ४