शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

युवा महोत्सवात ‘विवेकानंद’ भारी

By admin | Updated: September 5, 2015 00:16 IST

निकाल जाहीर : बुधवारपासून होणाऱ्या ‘मध्यवर्ती’साठी पहिल्या तीन विजेत्यांची निवड

कोल्हापूर : लोकनृत्य, लोककला, लोकसंगीत वाद्यवृंद, एकांकिका अशा विविध नऊ स्पर्धांमध्ये धडाकेबाज सादरीकरणाच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाच्या ३५ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विवेकानंद कॉलेजने यंदाही आपले वर्चस्व कायम राखले. महावीर महाविद्यालयात गुरुवारी (दि.३) झालेल्या महोत्सवाचा निकाल विद्यापीठाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आला. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांची निवड कडेगाव (जि. सांगली) येथे बुधवार (दि.९) पासून होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी झाली आहे.विजेते असे (प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ) : वक्तृत्व स्पर्धा (मराठी) - विवेकानंद कॉलेज, राधानगरी महाविद्यालय, डीकेटीई - इचलकरंजी, न्यू लॉ कॉलेज (भारती विद्यापीठ). हिंदी- राजाराम महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, डॉ. घाळी कॉलेज (गडहिंग्लज), यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय. इंग्रजी- केआयटी कॉलेज, भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज, संजीवनी इंजि. कॉलेज, पन्हाळा, कॉमर्स कॉलेज. वादविवाद स्पर्धा - विवेकानंद कॉलेज, जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज (जयसिंगपूर), दूधसाखर महाविद्यालय (बिद्री), संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज. सुगम गायन- कॉमर्स कॉलेज, केआयटी कॉलेज, संगीत व नाट्यशास्त्र विभाग (शिवाजी विद्यापीठ). भारतीय समूहगीत- कॉमर्स कॉलेज, केआयटी कॉलेज, विवेकानंद कॉलेज. मूकनाट्य स्पर्धा- भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज, महावीर महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, आजरा महाविद्यालय. पथनाट्य - कॉमर्स कॉलेज, डॉ. घाळी कॉलेज, विवेकानंद कॉलेज, न्यू कॉलेज. लघुनाटिका- भोगावती महाविद्यालय (कुरुकली), विवेकानंद कॉलेज, भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, अण्णासाहेब डांगे महाविद्यालय (हातकणंगले). एकांकिका- भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, शरद इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग (यड्राव), विवेकानंद कॉलेज, कॉलेज आॅफ आर्किटेक्चर, कोल्हापूर. लोकसंगीत वाद्यवृंद- विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज. लोककला - शरद इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग, विवेकानंद कॉलेज, न्यू कॉलेज, भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज. लोकनृत्य- न्यू कॉलेज, डीकेटीई, इचलकरंजी, आजरा महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज. मध्यवर्तीच्या तयारीला वेग विद्यापीठाचा ३५ वा मध्यवर्ती युवा महोत्सव ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान कडेगाव (जि. सांगली) येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात होणार आहे. यात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ७५ संघांतून सुमारे १५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. मध्यवर्ती युवा महोत्सवातील स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी ८४ परीक्षक कार्यरत असणार आहेत. त्यांना पत्रे तसेच मान्यवरांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यासह स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र बनविणे, आदी स्वरूपातील तयारी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाकडून वेगाने सुरू आहे.