शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमसिंहराजेंचे विचार आयुष्यभर साथ देतील

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

समरजितसिंह घाटगे : कार्यक र्त्यांशी साधला संवाद

कागल : राजेसाहेबांच्या आकस्मिक निधनाने आमच्या कुटुंबीयांबरोबरच आपल्या सर्वांवर ‘आभाळ’ कोसळले. मी तर फार खचून गेलो होतो. दिवसभर माझ्यासमोर अंध:कार दाटला होता. अंत्यसंस्कार करून घरी परत आलो तेव्हा समजले की शाहू साखर कारखान्याचे कामगार विक्रमसिंहराजेंचा ‘शब्द’ पाळण्यासाठी याही परिस्थितीत कारखान्याचे काम बंद न करता अश्रू ढाळीत काम करीत आहेत. या घटनेने मला आत्मविश्वास मिळवून दिला की राजेसाहेब शरीररूपाने नसतील पण त्यांचे विचार मला आयुष्यभर साथ देतील, अशा शब्दांत नूतन अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राजे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निमित्त होते कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पातील बायोगॅस प्रकल्पाच्या उद्घाटनाचे. नूतन अध्यक्ष म्हणून कारखान्याचा पहिलाच कार्यक्रम असल्याने समरजितसिंहां- बरोबर त्यांचे चुलते श्रीमंत प्रविणसिंहराजे, भाऊ विरेंद्रसिंहही हजर होते. घाटगे म्हणाले, मी आज तुमच्याशी जाहीर संवाद साधायचा तर काय बोलायचे, हा विचार करण्यासाठी घरात राजेसाहेबांच्याच खोलीत काही काळ जाऊन बसलो. राजेंच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. पण त्यांच्या विचारधारेंची पोकळी निर्माण होणार नाही. याची काळजी आपण घेऊया. त्यांच्या धोरणांची जपणूक करूया. बांधिलकी म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून शाहू आघाडीची जबाबदारी मी घेतलेली आहे. राजकारणात हे आपले वेगळे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवू. यावेळी आ. वीरकुमार पाटील, अमरसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)पवार आणि कागलचे राजकीय विद्यापीठआमदार वीरकुमार पाटील म्हणाले की, यापुढे ‘राजेगट’ म्हणून आमचा गट कार्यरत राहील. त्यांचे नेतृत्व समरजितसिंहराजे करतील. सीमाभागातील जनता तुमच्या पाठीशी कायम आहे. कागल तालुक्यात मात्र, जरा जपून पाऊल टाका, कारण एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात जर कोठे राजकीय विद्यापीठ स्थापन करायचे असेल तर ते मी कागललाच करेन.आठवड्यातील चार दिवस कागलमध्ये....समरजितसिंह घाटगे म्हणाले की, यापूर्वी माझा संपर्क कमी पडला असेल पण आता मी संपर्क वाढविणार आहे. आठवड्यातील चार दिवस शाहू साखर कारखाना आणि दूध संघावर थांबणार आहे. दोन दिवस कोल्हापुरात असेन. कोणीही कोठेही भेटा. पिढी बदलली आहे. चेहरा बदलला आहे पण राजेंच्या विचारांचे धोरण कायम आहे. माझे चुकले असे वाटले तर माझे चुलते प्रविणसिंहराजेंना सांगा, ते माझा कान पकडतील.