शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पाणी आटल्याने पंचगंगा काठावरील प्राचीन मंदिरांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 2:44 PM

कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने अनेक वर्षापासून पाण्यात असलेली अनेक प्राचीन मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. काळानुरुप आणि गाळ साठत राहिल्याने नदीचा मार्ग बदललेला असून दीडशे वर्षापासून साठलेला हा गाळ काढल्यास नदी मूळ मार्गाने प्रवाहित होईल, असे मत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपाणी आटल्याने पंचगंगा काठावरील प्राचीन मंदिरांचे दर्शनदीडशे वर्षापासून साठलेला गाळ काढल्यास नदीचा मूळ मार्गाने प्रवाहित होणार

कोल्हापूर : कोल्हापूरात पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने अनेक वर्षापासून पाण्यात असलेली अनेक प्राचीन मंदिरे खुली झाली आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. काळानुरुप आणि गाळ साठत राहिल्याने नदीचा मार्ग बदललेला असून दीडशे वर्षापासून साठलेला हा गाळ काढल्यास नदी मूळ मार्गाने प्रवाहित होईल, असे मत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.पंचगंगा नदीचा मार्ग अग्नेय दिशेला सरकल्यामुळे पूर्वी नदीच्या काठावर असणारी विविध प्राचीन मंदिरे पाण्यात गेली आहेत. शिवाजी पूल जेव्हा बांधण्यात आला, तेव्हाचा आराखडा उपलब्ध आहे. त्यावेळी जो मार्ग होता, त्या मार्गाने नदी पूर्ववत वाहू लागली तर आता पाण्यात असलेल्या मंदिरांना धोका पोहोचणार नाही.गेल्या अनेक वर्षात या नदीचा मार्ग बदलत गेला आहे. पाण्याच्या चक्राकार प्रवाहामुळे नदीसोबतचा माती आणि अन्य वस्तूंचा गाळ वायव्य दिशेला साठत गेला आहे. तो भराव हळूहळू इतका मोठा झाला की, नदी त्याला वळसा घालून पुढे जाउ लागली. त्यामुळे पूर्वी काठावर असणारी प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.तत्कालीन कागदपत्रे, जुनी छायाचित्रे, चित्रकार आबालाल रेहमान आणि इतरांनी काढलेल्या चित्रांमध्ये या नदीचा मूळ प्रवाह आणि काठावरील मंदिरे दिसून येतात. पूल बांधल्यानंतर झालेला बंधारा आणि काठावरील मंदिरांना पूर्वी धोका नव्हता, मात्र हळू हळू गाळामुळे ही मंदिरे पाण्यात गेली असे मत उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.सुस्थितीत असलेल्या यातील काही मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याची गरज आहे. परंतु तत्पूर्वी नदीपात्रात साठलेला गाळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. अन्यथा या मंदिरांची दुरुस्ती केली तरी ही मंदिरे पुन्हा पाण्यातच राहून नष्ट होतील, असे मत राणिंगा यांनी व्यक्त केले आहे.३0 ते ३५ प्राचीन मंदिरांचे दर्शनपंचगंगा नदीच्या काठावर अंदाजे ३0 ते ३५ प्राचीन मंदिरे बांधली गेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मयुरेश्वर (कार्तिक स्वामी), ब्रम्हदेव, दशाश्वमेधेश्वर यासारखी दुर्मिळ मंदिरे आहेत. याशिवाय अनेकांची समाधीस्थळे, छत्रपतींच्या देवांची मंदिरे या परिसरात आहेत. पाण्याखाली गेल्यामुळे मयुरेश्वर मंदिराची झीज होत आता केवळ चबुतरा शिल्लक आहे.

पायथे, चबुतरे, बैठका, दीपमाळा, शिलालेख

यासह अनेक अज्ञात मंदिरे, त्यांचे पायथे, चबुतरे, बैठका, दीपमाळा तसेच काही शिलालेखही पहायला मिळतात. यातील अनेक मंदिरे ढासळली आहेत. घाटावरच्या मागील बाजूस असलेली काही मंदिरेही ढासळलेली आहेत. याचा अभ्यास केल्यास नवीन माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :riverनदीTempleमंदिरkolhapurकोल्हापूर