शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकासाला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची जोड

By admin | Updated: October 15, 2014 00:30 IST

शिवाजी विद्यापीठ : शुक्रवारी उद्घाटन; कुलगुरू, प्र-कुलगुरू साधणार संवाद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाला या वर्षीपासून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जोडले जाणार आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध ठिकाणच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ होईल, अशी माहिती विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी दिली.शिवाजी विद्यापीठ आणि राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग पुरस्कृत माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शकांची उणीव दूर करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची जोड देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील कौशल्य प्रशिक्षणाची दरी कमी होण्यास मदत होणार आहे. उद्घाटनावेळी कुलगुरू डॉ. पवार, प्र-कुलगुरू डॉ. भोईटे यांच्यासह कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर, राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाचे सदस्य शैलेश पगारिया, अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक अतीश चोरडिया, बळवंत महाविद्यालयाचे डॉ. टी. एस. साळुंखे, देवचंद महाविद्यालयाचे डॉ. प्रकाश हेरेकर, प्राध्यापक, विद्यार्र्थी सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)ंविद्यापीठाच्या इतर परीक्षा विंभागांचे नामांतरशिवाजी विद्यापीठाच्या ‘इतर परीक्षा विभाग - चार’ (ओ. ई.-४) या कक्षाचे नामकरण ‘अभियांत्रिकी व तंत्रज्ञान परीक्षा विभाग’ असे करण्यात आले आहे. त्याच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवारी (दि. १७) दुपारी बारा वाजता होणार आहे. तसेच अभियांत्रिकी प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण आॅनलाइन पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या संगणक केंद्राने तयार केलेले सॉफ्टवेअर वापरण्याबाबत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिली.