शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कोडोली येथील कोविड रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर देणार- राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:34 IST

रुग्णसेवा, समाजहित व सामान्य रुग्णाला डोळ्यांसमोर ठेवून कोडोली येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी दिली

ठळक मुद्देकोडोली येथील कोविड रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर देणार- राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर : रुग्णसेवा, समाजहित व सामान्य रुग्णाला डोळ्यांसमोर ठेवून कोडोली येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी शासनामार्फत व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी दिलीयशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलमार्फत कोडोली (ता. पन्हाळा) येथे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या शंभर बेडच्या कोविड रुग्णालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील, प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.यड्रावकर म्हणाले, कोरोना उपाययोजनांना प्रशासनाने प्राधान्य दिले असून यामध्ये कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पिटल बेड व्यवस्थापन, डॉक्टरांचा समावेश आहे. या हॉस्पिटलसाठी शासनामार्फत सर्व सहकार्य केले जाईल, यासह पन्हाळा तालुक्यात आरोग्याच्या सर्व सुविधा युद्धपातळीवर राबविण्यात येतील. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय संस्थांनी आपापल्या भागात अशी हॉस्पिटल उभे केल्यास शासनामार्फत त्यांना सर्व सहकार्य केले जाईल.कोरोना रुग्णांसाठी वरदायी : पालकमंत्रीपालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ग्रामीण भागातील विशेषत: पन्हाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी हे रुग्णालय वरदायी ठरेल.सचिव डॉ. जयंत पाटील म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये ४० बेड ऑक्सिजनचे आहेत. शासनामार्फत आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत. येथे रुग्णांना सकस आहार, आयुर्वेदिक काढा देण्यात येणार आहे. रुग्णांकडून योगासने व व्यायाम करून घेतला जाणार असून स्वच्छ हवेसाठी रुग्णालयांमध्ये तुळशीची रोपे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोडोली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास अभिवंत, केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंकर पाटील, डॉ. सूर्यकिरण वाघ, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर