शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत ठिय्या सुरू, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 16:38 IST

वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून बैठका घेऊन ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात निर्णय झाले. परंतु त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी येथे दिला.

ठळक मुद्देवारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत ठिय्या सुरू, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मागे हटणार नाही : भारत पाटणकर

कोल्हापूर : वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून बैठका घेऊन ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात निर्णय झाले. परंतु त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी येथे दिला.तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक होऊन बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले होते. परंतु यावेळी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्याच्या निषेधार्थ स्थगित केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले. तत्पूर्वी टाऊन हॉल उद्यान येथून दुपारी बारा वाजता डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाला सुरुवात झाली.

मोर्चात सहभागी प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. महिलांची संख्या लक्षणीय होती. सीपीआर चौक, दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंपमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.डॉ. भारत पाटणकर म्हणाले, वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक होऊनही ठोस निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत एकही आंदोलक इथून हटणार नाहीत.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगले, शंकर पाटील, पांडुरंग पोवार, वसंत पाटील, अशोेक पाटील, पांडुरंग कोठारी, आनंदा आमकर, शामराव कोठारी, राजाराम पाटील, सुरेश पाटील, हौसाबाई घोलप, अनिता पवार, सविता पाटील, आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर