कोल्हापूर: दोन गटातील वाद, सात-आठजणांच्या टोळक्यांनी घरात घुसून केली प्रापंचिक साहित्याची जाळपोळ

By तानाजी पोवार | Published: August 16, 2022 02:29 PM2022-08-16T14:29:21+5:302022-08-16T14:29:44+5:30

जुन्या हल्ल्याचा राग काढत सात-आठजणांच्या टोळक्यानी घरात घुसून प्रापंचिक साहित्याची जाळपोळ करत दहशत माजवली

Varekar's house at Shingnapur in Kolhapur was attacked and vandalized and set on fire | कोल्हापूर: दोन गटातील वाद, सात-आठजणांच्या टोळक्यांनी घरात घुसून केली प्रापंचिक साहित्याची जाळपोळ

कोल्हापूर: दोन गटातील वाद, सात-आठजणांच्या टोळक्यांनी घरात घुसून केली प्रापंचिक साहित्याची जाळपोळ

Next

कोल्हापूर : जुन्या हल्ल्याचा राग काढत सात-आठजणांच्या टोळक्यानी घरात घुसून प्रापंचिक साहित्याची जाळपोळ करत दहशत माजवली. लक्षतिर्थ वसाहतमधील हे संशयित सात-आठजणांचे टोळके होते. या टोळक्यांनी शिंगणापूर (ता. करवीर) येथील वरेकर यांच्या घरावर सशस्त्र हल्ला करत प्रापंचिक सहित्याची तोडफोड व जाळपोळ करत धुडगुस घातला. ही घटना काल, सोमवारी घडली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चार अनोळखीसह एकूण सातजणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल झालेल्यांची नावे अशी : राजू बोडके (रा. लक्षतिर्थ वसाहत), उमेश कोळपाटे, विश्वजीत फाले, (दोघेही रा. बोंद्रनगर, रिंगरोड) व अनोळखी चारजण.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाढदिवसाचे पोष्टर फाडल्याप्रकरणी लक्षतिर्थ वसाहतमधील संतोष बोडके याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. हा वाद धुमसत असतानाच बोडके गटाचे सात-आठजण काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास दहशत माजवत नितीन वरेकर याच्या घरात घुसले. प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली.

गादी, कपडे, मोबाईल, सीसीटिव्ही, डिव्हीआर याचीही तोडफोड करत एकत्रित करुन पेट्रोल ओतून ते पेटवून दिले. याबाबत गिता तानाजी वरेकर यांनी मंगळवारी सकाळी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण करत आहेत.

Web Title: Varekar's house at Shingnapur in Kolhapur was attacked and vandalized and set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.