शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी वंदना हळदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:30 IST

राधानगरी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच, राष्ट्रीय काँग्रेस चार, तर शिवसेनेचे एक असे बलाबल आहे. आघाडीच्या समझोत्यानुसार शिवसेनेच्या सुशीला ...

राधानगरी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच, राष्ट्रीय काँग्रेस चार, तर शिवसेनेचे एक असे बलाबल आहे. आघाडीच्या समझोत्यानुसार शिवसेनेच्या सुशीला भावके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर राष्ट्रवादीचे मोहन पाटील प्रभारी सभापती म्हणून कार्यरत होते. आजच्या सभापतीपदाच्या निवड सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना विलास हळदे यांची बहुमताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष भिकाजीराव हळदकर यांच्या नेतृत्वाखाली सभापती निवडीचा समझोता ठरविण्यात आला होता.

निवड सभेला गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, सहायक गटविकास अधिकारी शरद शिंदे, सदस्य सर्वश्री दिलीप कांबळे, उत्तम पाटील, रवीश पाटील, वनिता पाटील, कल्पना मोरे, दीपाली पाटील, सोनाली पाटील, सुशीला भावके, विलास हळदे आदींची उपस्थिती होती.

फोटो - नूतन सभापती वंदना हळदे यांना निवडीचे प्रमाणपत्र देताना राधानगरीच्या तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी मीना निंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगुले, ज्येष्ठ नेते कृष्णराव किरूळकर, प्रा. किसन चौगले, भिकाजी हळदकर आदी.

छाया -श्रीकांत ऱ्हायकर