जिरगे तिकटी येथे व्हॅल्वमध्ये बिघाड, परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:14 IST2020-05-29T18:12:41+5:302020-05-29T18:14:59+5:30

जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

Valve failure at Jirge Tikati, water supply disrupted in the area | जिरगे तिकटी येथे व्हॅल्वमध्ये बिघाड, परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

जिरगे तिकटी येथे मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघड झाला असून परिसरात पाणी टंचाई आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरु आहे.

ठळक मुद्देजिरगे तिकटी येथे व्हॅल्वमध्ये बिघाडपरिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

कोल्हापूर : जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनमधून शहरातील बहुतांशी परिसरात पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली होती.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तपासणी केली असता जिरगे तिकटी येथील मुख्यलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले. पाणीपुरवठा विभागाकडून व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरु आहे. मुख्यपाईपलाईनवरुन पाणीपुरवठा होणाय्रा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणी टंचाई आहे.
 

Web Title: Valve failure at Jirge Tikati, water supply disrupted in the area