शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पराभव दिसू लागल्यानेच मुश्रीफ यांच्याकडून वल्गना - राहुल चिकोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST

कोल्हापूर : मुघल सैनिकांना जसे पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्येक ...

कोल्हापूर : मुघल सैनिकांना जसे पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्येक ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिसत आहेत. निवडणुकीत आपला पराभव दिसू लागल्यानेच त्यांच्याकडून वल्गना सुरू असल्याची टीका भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून केली.

‘खोटे बोल, पण रेटून बोल,’ या उक्तीप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाबडेपणाचा खोटा आव आणला आहे. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना अनेक तांत्रिक त्रुटींमुळे रेंगाळली. तीर्थक्षेत्र विकास आराखडासुद्धा महापालिकेच्या उदासीनतेमुळे रखडला आहे; पण निवडणुकीच्या तोंडावर ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या अपयशी कारभाराचे खापर ते भाजपवर फोडू पाहत आहेत.

महापालिकेत ढपला पाडण्याची पद्धती त्यांच्याच काळात रुजली. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री असताना कोल्हापूर महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य केले. भाजप युतीची सत्ता असताना राजकीय द्वेषातून आणि भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी महापालिकेने अनेक प्रस्ताव पाठवले नाहीत.

महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आता कोल्हापूरकरांची दिशाभूल करायची, असा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. मात्र कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे.

या मंडळींच्या काळातच कोल्हापूरकरांवर टोल लादला. द्वेषातून बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा मंत्री मुश्रीफ यांनी द्वेषाचा चष्मा उतरून चंद्रकांत पाटील यांची विकासकामे पाहावीत, असेही चिकोडे यांनी पत्रकात म्हटले आहे.