लस घेतल्याने कोरोनापासून झाला बचाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:31+5:302021-04-27T04:25:31+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या सुचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी पहिल्या टप्प्यात २२ ...

Vaccination protects against corona | लस घेतल्याने कोरोनापासून झाला बचाव

लस घेतल्याने कोरोनापासून झाला बचाव

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या सुचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी पहिल्या टप्प्यात २२ एप्रिलल २०० जणांची अँटिजेन चाचणी केली होती. दुसऱ्या टप्प्यात सोमवारी आणखी ८५ जणांची चाचणी करण्यात आली. दोन्ही चाचण्यांमध्ये एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये फ्रंट लाईन वर्करमध्ये पंचायत राज संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याुसार ९५ टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पहिला तर ९० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत आतापर्यंत घेतलेल्या २८५ चाचण्यांमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश नलवडे, अमित नलवडे, स्मिता शिंदे, उत्तम कलिकते, संतोष गुरव यांनी या चाचण्यांचे नियोजन केले.

Web Title: Vaccination protects against corona