व्ही. एन. शिंदे, अनुप जत्राटकर यांना राज्य वाङ्मय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:15+5:302021-02-05T06:56:15+5:30

राज्य शासनातर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान केले जातात. या अंतर्गत सन ...

V. N. State Literary Award to Shinde, Anup Jatratkar | व्ही. एन. शिंदे, अनुप जत्राटकर यांना राज्य वाङ्मय पुरस्कार

व्ही. एन. शिंदे, अनुप जत्राटकर यांना राज्य वाङ्मय पुरस्कार

राज्य शासनातर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान केले जातात. या अंतर्गत सन २०१९ या वर्षासाठी डॉ. शिंदे यांच्या पुस्तकाला प्रौढ वाङ्मय-विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) या विभागातील पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये आहे. डॉ. शिंदे यांनी सन २०१९ मध्ये ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ हे पुस्तक लिहिले. त्यात आवर्त सारणीतील सर्व ११८ मूलद्रव्यांची माहिती आणि आवर्त सारणीचा इतिहास उलगडून मांडला आहे. लेखक-दिग्दर्शक जत्राटकर यांना प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका) विभागातून पुरस्कार जाहीर झाला. त्याची रक्कम ५० हजार रुपये आहे. जत्राटकर यांचा हा पहिला एकांकिका संग्रह असून त्यातील एकांकिकांचे प्रयोग विविध स्पर्धांतून सादर झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून यंदा पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र हे साहित्यिकांना घरपोच प्रदान होणार असून पुरस्काराची रक्कम त्यांच्या बँकखात्यावर हस्तांतरित केली जाणार आहे.

चौकट

‘लोकमत’मुळे पुस्तक साकारले

‘लोकमत’मधील विज्ञान सदरातील ‘धन्यवाद मेंडलीव’ या एका लेखाच्या माध्यमातून हे ४३६ पानांचे पुस्तक लिहिण्याचे बीज माझ्यामध्ये रुजले. त्यासह विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जिज्ञासेचा त्यात मोठा भाग आहे. यापुढेही लिहीत राहण्यासाठी हा पुरस्कार ऊर्जा देणारा असल्याची प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.

फोटो (२८०१२०२१-कोल-व्ही एन शिंदे (पुरस्कार), अनुप जत्राटकर (पुरस्कार)

Web Title: V. N. State Literary Award to Shinde, Anup Jatratkar