उत्तम मोहिते आंदोलनातून इचलकरंजीत चर्चेत, खुनाच्या बातमीनंतर अनेकजण झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:56 IST2025-11-13T16:52:54+5:302025-11-13T16:56:18+5:30
इचलकरंजी : सांगलीत खून झालेल्या दलित महासंघ मोहिते गटाचा संस्थापक उत्तम मोहिते याने इचलकरंजी वास्तव्यादरम्यान प्रशासनाविरोधात अनेक आंदोलने करून ...

उत्तम मोहिते आंदोलनातून इचलकरंजीत चर्चेत, खुनाच्या बातमीनंतर अनेकजण झाले अवाक्
इचलकरंजी : सांगलीत खून झालेल्या दलित महासंघ मोहिते गटाचा संस्थापक उत्तम मोहिते याने इचलकरंजी वास्तव्यादरम्यान प्रशासनाविरोधात अनेक आंदोलने करून चर्चेत आला होता. त्याच्या खुनाची बातमी धडकल्यानंतर अनेकजण अवाक् झाले.
सतीश व उत्तम मोहिते हे इचलकरंजी शहरामध्ये सन २००७ ते २०११च्या दरम्यान असताना दोन्ही बंधूंनी विविध आंदोलने करून प्रशासनाला जेरीस आणले होते. त्यामध्ये उत्तम याने आयजीएम रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात केलेले आंदोलन चर्चेचे ठरले होते. डॉक्टर रुग्णांना योग्य पद्धतीने हाताळत नाहीत, असा आरोप करीत त्याने म्हैस सोडण्याचे आंदोलन केले होते.
वाचा- दलित महासंघाच्या नेत्याचा सांगलीत धारदार शस्त्राने खून
त्यानंतर रेशन दुकानाच्या विरोधात पुरवठा कार्यालयात संबंधितावर कारवाई करावी, यासाठी विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर आंदोलनासंदर्भातील गुन्हेही दाखल झाले आहेत.
वाचा- सांगलीत डबल मर्डर नाहीच! खून करताना सहकाऱ्यांचाच चाकू लागला अन् मृत्यू झाला, नेमकं काय घडलं?
सुमारे १०२५ आंदोलने त्याने केल्याचे सांगण्यात येते. काही काळ वाहनचालक म्हणूनही काम केले होते. तसेच ड्रायव्हरांची संघटनाही बांधण्याचा प्रयत्न केला होता. एका गटाबरोबर झालेल्या वादानंतर तो येथून निघून जाऊन आपले आंदोलन सांगलीत सुरू ठेवले.