शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जयसिंगपूरच्या कन्येचा अमेरिकेत डंका, उर्मिला अर्जुनवाडकर यांची उपमहापौरपदी फेरनिवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:07 IST

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर एका मराठी महिलेची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट

संदीप बावचे

जयसिंगपूर: शिक्षणाचे माहेरघर असलेल्या जयसिंगपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जयसिंगपूरच्या कन्या उर्मिला अशोक पुरंदरे - अर्जुनवाडकर यांची नुकतीच अमेरिकेतील न्यू जर्सी प्रांतातील ‘होपवेल’ टाउनशिपच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली. या निवडीमुळे जागतिक स्तरावर जयसिंगपूरचे नाव उजळले आहे.

उर्मिला अर्जुनवाडकर यांचे बालपण आणि शिक्षण जयसिंगपूरमध्ये झाले. शहरातील गल्ली नंबर चारमध्ये वास्तव्यास असलेल्या जनार्दन अर्जुनवाडकर यांच्या त्या कन्या आहेत. उर्मिला या गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ न्यू जर्सी येथील प्रतिष्ठित औषध कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती डॉ. अशोक विनायक पुरंदरे वैद्यकीय सेवेत आहेत. चार वर्षे नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले आहे. याआधी २०२४ मध्येही उपनगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती.
 
चार वर्षांच्या काळात त्यांनी आरोग्य, शाश्वत पर्यावरण विकास व संवर्धन, शहर संरचना या विभागाचे नेतृत्व केले. या कामगिरीमुळे त्यांच्याकडे पुन्हा उपनगराध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर एका मराठी महिलेची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

होपवेल टाउनशिपच्या प्रशासनात आणि विकासकामांत आता जयसिंगपूरच्या कन्येचा शब्द प्रमाण मानला जाणार आहे. त्यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने अमेरिकेच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. गेली चार वर्षे या प्रतिष्ठित नगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत.

उर्मिला यांचे योगदान

कोविडनंतरच्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी उत्कृष्ट योजना व कार्यवाही केली. आरोग्यविषयक जागृतीसाठी देखील त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. औषध निर्मिती कंपनीत शास्त्रज्ञ असल्याचा फायदा त्यांना व तेथील नागरिकांना झाला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्या आग्रही असतात. होपवेल नगरपरिषदेला त्यांच्या धोरणामुळेच शाश्वत पर्यावरण विकास व संवर्धनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. शिवाय नगरसंरचनेमधील योगदानामुळे कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक नगरपरिषदेत आणण्यात त्यांचा विशेष सहभाग आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Daughter Urmila Arjunwadkar Re-elected as Deputy Mayor in America

Web Summary : Urmila Arjunwadkar from Jaysingpur, Kolhapur, has been re-elected as Deputy Mayor of Hopewell Township, New Jersey. Her contributions in health, environment, and urban development led to this honor, bringing pride to Jaysingpur.