शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससी निकाल: कोल्हापूरात पाचजण बनले आयएएस, जयसिंगपूरचा ऋषिकेश देशात ६१ वा

By संदीप आडनाईक | Updated: March 6, 2026 23:26 IST

भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे चौघांचे यश

संदीप आडनाईक

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या रोहित मालवेकर, सिद्धार्थ तगड, प्रथमेश शिंदे, मनोज पाटील या चार विद्यार्थ्यांसह जयसिंगपूरच्या ऋषिकेश राजेंद्र आलासे हे पाचजण आयएएस झाले आहेत. विशेष म्हणजे ऋषिकेशचा पहिल्या १०० क्रमांकांत समावेश आहे. त्यांच्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

देशातील या सर्वात कठीण परीक्षेचे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे पार करावे लागतात. यंदाची पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी झाली. मुख्य परीक्षा २२ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान झाली. एकूण २,७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले. देशभरातून ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मुलाखत प्रक्रिया ५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडली.

कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे रोहित मालवेकर (६०१), सिद्धार्थ तगड (६१९) प्रथमेश शिंदे (८१७) आणि मनोज पाटील (४९३) हे चौघेही आयएएस बनले आहेत. मूळच्या अहिल्यानगरच्या २५ वर्षीय सिध्दार्थने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. त्याचे वडील कृषिक्षेत्रात कार्यरत आहेत. मनोज पाटील हे २०१८ च्या बॅचचे विद्यार्थी आहेत.

ऋषिकेशचे कठोर परिश्रम

कठोर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर जयसिंगपूरच्या ऋषिकेश आलासे (वय २७) याने युपीएससी परीक्षेत देशभरात ६१ वा क्रमांक पटकावून आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले. ऋषिकेशचे प्राथमिक शिक्षण सांगलीत, तर त्यानंतरचे शिक्षण मुंबईत झाले. एनटीएससीमध्ये तो देशात सतरावा आला होता. स्वयं अध्ययनातून या परीक्षेचे त्याने तयारी केली. दोन वेळा त्याचे यश हुकले होते. शुक्रवारी मात्र त्याने देशभरात ६१ वे स्थान पटकावले. त्याचे वडील राजेंद्र आणि आई विद्या हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रात आहेत.

ध्येयावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करताना स्वतःवर आत्मविश्वास असणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे यशाचा मार्ग मोकळा होतो -ऋषिकेश आलासे, जयसिंगपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Achieves IAS Success: Five Selected, Rushiikesh Alase Ranks 61st

Web Summary : Five from Kolhapur, including Rushiikesh Alase (rank 61), cleared UPSC. Four trained at Kolhapur's pre-IAS center. Alase's success highlights dedication and hard work.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगkolhapurकोल्हापूर