शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

उमेद मायेच्या घराला आर्थिक पाठबळांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST

सरदार चौगुले लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : माणुसकीच्या धर्मातून वंचितांसाठी काम करणाऱ्या उमेद फाउंडेशनने गरजू, गरीब आणि ...

सरदार चौगुले

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : माणुसकीच्या धर्मातून वंचितांसाठी काम करणाऱ्या उमेद फाउंडेशनने गरजू, गरीब आणि एक पालकत्व असलेल्या मुलांसाठी ‘उमेद मायेचे घर’ या सामाजिक प्रकल्पाच्या (वसतिगृह) कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. लोकसहभागातून उमेदने सुरू केलेल्या या प्रकल्पाला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सामाजिक दायित्वाची गरज मिळाली तरच ही सामाजिक भावनेची संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते.

ऊसतोड मजूर, कचरावेचक आणि स्थलांतरित मुलांसाठी शैक्षणिक चळवळतून त्यांच्यात शैक्षणिक उमेद निर्माण करू पाहत आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या या सामाजिक संकल्पनेला दायित्वतेच्या पाठबळाची गरज आहे. उमेद कोल्हापूर सांगली, सिंधुदुर्ग आणि जालना जिल्ह्यात सामाजिक चळवळ राबवत असताना काही गरजू आणि वंचित मुलींच्या व्यथा समोर आल्या. त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी उमेद फाउंडेशनने दोन वर्षांपासून ‘उमेद मायेचे घर’ या सामाजिक प्रकल्पाला सुरुवात केली आहे. मुलांचे मोफत शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी फाउंडेशनने घेतली आहे. सध्या भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या प्रकल्पासाठी अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी १७ लाखांच्या जबाबदारी जमीन घेतली आहे. ३५ लाख रुपये निधीची गरज असलेला प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभही झाला आहे; परंतु आर्थिक बाब या प्रकल्पाच्या आड येत आहे. उमेदने सुरू केलेल्या सामाजिक कार्याला कोणतीही शासकीय मदत नाही. त्यामुळे सामाजिक कार्याच्या चळवळीला सामाजिक दायित्वतेच्या भावनेची साथ मिळाली तरच माणुसकीचे बंध घट्ट होऊ शकतील.

तरुणाईला स्वावलंबी बनवणार

गरीब, वंचित, एक पालकत्व, दुष्काळग्रस्त, शेतकरी आत्महत्याग्रस्त, स्थलांतरित आणि कचरावेचक मुलांचे मोफत शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी उमेद मायेच्या घराच्या माध्यमातून फाउंडेशन करणार असले तरी त्यांच्या संगोपनाचा खर्चही फाउंडेशनला आवाहनात्मक असणार आहे. या वसतिगृहात शाश्वत ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र आणि महिला व युवक रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करून तरुणाईला स्वावलंबी बनवणार आहे.

केोट...

वंचित आणि गरजू मुलांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरून, त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम उमेद फाउंडेशन करत आहे. ‘उमेद मायेचे घर’ या वसतिगृहाच्या माध्यमातून उमेद माणुसकीची भिंती उभ्या करू पाहत आहे. समाजातील मदतीतून चाललेल्या मानवतेच्या मोहिमेला मदतीची गरज आहे.

-प्रकाश गाताडे, उमेद फाउंडेशन, अध्यक्ष