शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘उमेद मायेचं घर’ला अर्थिक पाठबळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे म्हणजे माणुसकीचा धर्म होय. याच माणुसकीच्या धर्मातून वंचितांसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे म्हणजे माणुसकीचा धर्म होय. याच माणुसकीच्या धर्मातून वंचितांसाठी काम करणाऱ्या उमेद फाऊंडेशनने गरजू, गरीब आणि एक पालकत्व असलेल्या मुलांसाठी ‘उमेद मायेचं घर’ या सामाजिक प्रकल्पाच्या (वसतिगृह) कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली आहे. लोकसहभागातून ‘उमेद’ने सुरू केलेल्या या प्रकल्पाला अर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सामाजिक दायित्वाची साथ मिळाली तरच ही सामाजिक भावनेची संकल्पना पूर्णत्वाला जाऊ शकते. ऊसतोड मजूर, कचरावेचक आणि स्थलांतरित मुलांसाठीच्या शैक्षणिक चळवळीतून त्यांच्यात शैक्षणिक उमेद निर्माण करू पाहत आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या या सामाजिक संकल्पनेला दायित्वतेच्या पाठबळाची गरज आहे. उमेद कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि जालना जिल्ह्यात सामाजिक चळवळ राबवत असताना काही गरजू आणि वंचित मुलींच्या व्यथा समोर आल्या. त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी उमेद फाऊंडेशनने दोन वर्षांपासून ‘उमेद मायेचं घर’ या सामाजिक प्रकल्पाला सुरूवात केली आहे. मुलांचे मोफत शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी फाऊंडेशनने घेतली आहे. सध्या भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी १७ लाखांची जबाबदारी जमीन घेतली आहे. ३५ लाख रूपये निधीची गरज असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभही झाला आहे; परंतु अर्थिक बाब या प्रकल्पाच्या आड येत आहे. ‘उमेद’ने सुरू केलेल्या सामाजिक कार्याला कोणतीही शासकीय मदत नाही. त्यामुळे सामाजिक कार्याच्या या चळवळीला सामाजिक दायित्वतेच्या भावनेची साथ मिळाली तरच माणुसकीचे बंध घट्ट होऊ शकतील.

कोट...

वंचित आणि गरजू मुलांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरून, त्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचे काम उमेद फाऊंडेशन करत आहे. ‘उमेद मायेचं घर’ या वसतिगृहाच्या माध्यमातून उमेद माणुसकीची भिंत उभी करू पाहत आहे. समाजाच्या मदतीतून चाललेल्या या मानवतेच्या मोहिमेला मदतीची गरज आहे.

प्रकाश गाताडे, अध्यक्ष, उमेद फाऊंडेशन