भेंडवडेतील सोनार्ली वसाहतीतील दोघे युवक अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST2021-04-20T04:26:33+5:302021-04-20T04:26:33+5:30

खोची: हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील सोनार्ली वसाहतीतील दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला. कोंडिबा भागोजी पाटणे (वय ३०) व जाणू ...

Two youths from Sonarli colony in Bhendwade were killed in an accident | भेंडवडेतील सोनार्ली वसाहतीतील दोघे युवक अपघातात ठार

भेंडवडेतील सोनार्ली वसाहतीतील दोघे युवक अपघातात ठार

खोची: हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील सोनार्ली वसाहतीतील दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला. कोंडिबा भागोजी पाटणे (वय ३०) व जाणू भैरू झोरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात कराड तालुक्यातील उंडाळे येथे कराड-रत्नागिरी महामार्गावर रविवारी रात्री झाला.

रविवारी सकाळी शिराळा तालुक्यात नातेवाइकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. रात्री परतत असताना त्यांची दुचाकी उंडाळे येथील काम सुरू असलेल्या पुलावरून कोसळली. यामध्ये वरील दोघांचा मृत्यू झाला. तर दगडू बिरू झोरे हे जखमी झाले. जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोंडिबा पाटणे हे विवाहित असून त्यांना लहान दोन मुले व एक मुलगी आहे.पत्नी,आई व भाऊ शेतमजुरी करतात. यशवंत सेनेचे जिल्हा संपर्क म्हणून ते कार्यरत होते. समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते अग्रभागी राहून काम करीत होते. अनेक प्रश्नांची त्यांनी सोडवणूक केल्याने ते लोकप्रिय झाले होते.

जाणू झोरे हे टेम्पोचालक होते. एकुलता एक मुलगा मृत्यू पावल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.

१९ कोंडिबा पाटणे

१९ जाणू झोरे

Web Title: Two youths from Sonarli colony in Bhendwade were killed in an accident