भाजी मार्केटमधून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:24 IST2021-04-21T04:24:20+5:302021-04-21T04:24:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमध्ये पार्क केलेली सुमारे वीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली. रमेश ...

Two-wheeler theft from vegetable market | भाजी मार्केटमधून दुचाकी चोरी

भाजी मार्केटमधून दुचाकी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमध्ये पार्क केलेली सुमारे वीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली. रमेश शंकर बर्गे (रा. गगनगिरी हौसिंग सोसायटी, समता हायस्कूल, भोसलेवाडी) हे भाजी खरेदीसाठी लक्ष्मीपुरी बाजारपेठेत गेले. बाजारात दुचाकी हँडल लॉक करून पार्क केली होती. अज्ञाताने ती नजर चुकवून चोरून नेली. त्यांनी चोरीची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.

दुचाकी चोरीचा एकावर गुन्हा

कोल्हापूर : शाहूपुरी सहाव्या गल्लीतील सुदर्शन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे ३१ हजार १०० रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली. नित्येश दत्तात्रय कुंभार (वय ३१, रा. सुदर्शन अपार्टमेंट) यांनी दुचाकी चोरीच्या दिलेल्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी सागर मारनूर (रा. माधवनगर, सांगली) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Two-wheeler theft from vegetable market