Kolhapur: पिराचीवाडीतील सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू, आईला जेवण घेऊन शेताकडे गेल्या असता घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:27 AM2024-01-18T11:27:23+5:302024-01-18T11:28:50+5:30

दत्तात्रय पाटील  म्हाकवे : पिराचीवाडी ता.कागल येथे दोन सख्या बहिणींचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. आराध्या सुरेश भोसले ...

two sisters of Pirachiwadi fell into the well and died | Kolhapur: पिराचीवाडीतील सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू, आईला जेवण घेऊन शेताकडे गेल्या असता घडली दुर्घटना

Kolhapur: पिराचीवाडीतील सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू, आईला जेवण घेऊन शेताकडे गेल्या असता घडली दुर्घटना

दत्तात्रय पाटील 

म्हाकवे : पिराचीवाडी ता.कागल येथे दोन सख्या बहिणींचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. आराध्या सुरेश भोसले (वय ६) व आरोही सुरेश भोसले (९) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या आईचे जेवण देण्यासाठी त्या दोघीजणी शेतात गेल्या होत्या. घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे. चिमुकल्या बहिणींचे मृतदेह पाहून अख्खा गाव गहिवरला.

सुरेश भोसले हे हमालीच्या कामासाठी गेल्याने शेतीची जबाबदारी पत्नी अश्विनी यांच्यावर आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी अश्विनी या गावच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या वाळवे बुद्रुक (ता. राधानगरी) गावच्या हद्दीतील शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आराध्या व आरोही या आईला जेवण घेऊन गेल्या होत्या.

तिघी मायलेखीनी एकञित जेवण करून आईने या दोघींना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या आपल्या कामात गुंतल्या. उसाला पाणी देवून झाल्यानंतर आई अश्विनी घरी गेल्या. मात्र आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले. बराच वेळ  शोधाशोध केली. 

शोधाशोध सुरू असताना विहिरीवर दोन्ही मुलींची चपले दिसून आली. विहिरीत पाणी कमी होते. यात दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात सापडले. सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून राञी पिराचीवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोही ही इयत्ता तिसरीत शिकत होती. अत्यंत हुशार, शांत व प्रत्येक कामात नेहमी पुढे असत. दुर्दैवी घटनेने महिलांसह नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे 

Web Title: two sisters of Pirachiwadi fell into the well and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.