केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:18 PM2024-06-14T12:18:48+5:302024-06-14T12:26:43+5:30

Chirag paswan: चिराग पासवान यांच्याकडे फूड प्रोसेसिंग विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी चिराग हे बॉलिवूडमध्ये सक्रीय होते.

सध्या राजकीय वर्तुळात आणि कलाविश्वात चिराग पासवान यांची चर्चा रंगली आहे. तब्बल तीन वेळा ते लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले आहेत.

चिराग यांनी २०१४ मध्ये बिहारच्या राजकारणात प्रवेश केला. लोक जनशक्ती पार्टीसाठी त्यांनी जमुई येथून निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते २०१९ मध्ये ते पुन्हा एकदा जमुई जागेवरून खासदार म्हणून निवडून आले आणि आता 2024 मध्ये मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

चिराग पासवान यांच्याकडे फूड प्रोसेसिंग विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी चिराग हे बॉलिवूडमध्ये सक्री होते.

2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ या सिनेमात ते झळकले होते. या सिनेमात त्यांनी कंगना रणौतसोबत स्क्रीन शेअर केली होती.

चिराग यांनी १२ वी पर्यंतचं शिक्षण नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगमधून पूर्ण केले.

मीडिया रिपोर्टनुसार, रामविलास पासवान यांचा लेक असलेल्या चिराग यांनी १२ वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंगसाठी अॅडमिशन घेतलं होत.

चिराग यांनी बुंदेलखंड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून कम्प्युटर सायन्समधून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स देखील केल्याचं म्हटलं जातं.