Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 11:44 AM2024-06-14T11:44:57+5:302024-06-14T12:20:28+5:30

Kangana Ranaut : खासदार म्हणून कंगनाला पगाराशिवाय इतर कोणत्या सुविधा मिळणार आहेत हे जाणून घेऊया...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिची आता नवी ओळख निर्माण झाली आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर कंगना राणौत आता भाजपाकडून खासदार बनली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कंगना राणौतने दणदणीत विजय मिळवला होता.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणौतला भाजपाने तिकीट दिलं आहे. कंगनाच्या समोर काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह होते. कंगनाने काँग्रेस उमेदवाराचा जवळपास 74 हजार मतांनी पराभव केला आणि तिने आपल्या राजकीय प्रवासाची चांगली सुरुवात केली.

कंगना राणौतही जिंकल्यानंतर संसदेत पोहोचली. 9 जून रोजी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यातही ती दिसली होती. कंगना राणौत आता अनेकदा संसदेत दिसणार आहे. खासदार झाल्यानंतर ती संसद भवनात सतत येत-जात राहणार आहेत.

खासदार झाल्यानंतर कंगना राणौतच्या आयुष्यातही काही बदल पाहायला मिळणार आहेत. खासदार म्हणून, पगाराव्यतिरिक्त अभिनेत्रीला इतर अनेक विशेष सुविधा मिळतील ज्या देशातील प्रत्येक खासदाराला मिळतात.

खासदार म्हणून कंगनाला पगाराशिवाय इतर कोणत्या सुविधा मिळणार आहेत हे जाणून घेऊया. इतर खासदारांना ज्या सुविधा मिळतात त्या तिलाही आता मिळणार आहेत.

कंगनाला लोकसभा मतदारसंघासाठी दरमहा ७० हजार रुपये भत्ता देण्यात येईल. त्याचबरोबर कार्यालयीन खर्चासाठी त्यांना दरमहा ६० हजार रुपये मिळतील. यात स्टेशनरीचा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर गोष्टींचा समावेश असेल.

दरमहा एक लाख रुपये पगार असणार आहे. इतर खासदारांप्रमाणेच कंगना राणौतलाही मोफत हाय-स्पीड इंटरनेट आणि दरवर्षी १.५ लाखांपर्यंत मोफत टेलिफोन कॉल्सची सुविधा मिळेल.

याशिवाय दरवर्षी ४ हजार लिटर पाणी आणि ५० हजार युनिट मोफत विजेची सुविधाही दिली जाणार आहे. अभिनेत्रीला खासदार म्हणून मोफत घरही मिळणार आहे. जर ती या घरात राहणार नसेल तर होम अलाऊन्स म्हणून ती दरमहा दोन लाख रुपये घेऊ शकते.

याशिवाय कंगनाला दरवर्षी ३४ वेळा फ्लाइटने प्रवास करणं मोफत असेल. अभिनेत्रीला इतर खर्चासाठी दररोज दोन रुपये दिले जातील. तर कंगनाला भारत सरकारकडून मोफत वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जाणार आहेत.