कोल्हापूर: शहरामध्ये आणखी दोन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या पाच झाली आहे.शहरातील एका ७३ वर्षीय वृद्धेसह एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून, आता या दोघांचीही प्रकृती स्थिर असून, दोघांवरही घरीच उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.गेल्या दोन दिवसांपूर्वी एकूण तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये ग्रामीण भागातील एक, परजिल्ह्यातील एक आणि शहरातील एका रुग्णाचा समावेश होता.सध्या पाऊस असल्याने नागरिकांनी ताप, थंडी, खोकल्यामुळे घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
कोल्हापुरात आणखी दोघांना कोरोनाची लागण, एकूण रुग्ण पाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:36 IST