आणखी दोन दिवस जिल्ह्यावर पावसाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:06+5:302021-02-20T05:10:06+5:30

कोल्हापूर : उत्तर कर्नाटक व विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीसह जोरदार पाऊस कोसळला. शुक्रवारी ...

Two more days of rain in the district | आणखी दोन दिवस जिल्ह्यावर पावसाचे सावट

आणखी दोन दिवस जिल्ह्यावर पावसाचे सावट

कोल्हापूर : उत्तर कर्नाटक व विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीसह जोरदार पाऊस कोसळला. शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात काही काळ ढगाळ वातावरण राहिले. आणखी दोन दिवस जिल्ह्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसाने भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे दोडका, वांगी, काकडीला फटका बसला आहे. उत्तर कर्नाटक व विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आणखी दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील व तुरळक पावसाची शक्यताही वर्तवली आहे.

शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी दहानंतर ढगांची दाटी कमी होऊन सूर्यनारायणाने दर्शन दिले. दिवसभर मात्र थंड वारे वाहत होते. त्यामुळे अंगातून गारठा जात नव्हता. शुक्रवारी किमान १८, तर कमाल २७ डिग्रीपर्यंत तापमान राहिले. आज, शनिवारपासून तापमानात वाढ होत जाणार आहे. सोमवार (दि. २२) पर्यंत ३३ डिग्रीपर्यंत तापमान जाईल, असा अंदाज आहे.

असे राहील तापमान...

वार किमान कमाल वातावरण

शनिवार १९ ३१ ढगाळ, तुरळक पाऊस

रविवार १९ ३२ ढगाळ

सोमवार १९ ३३ स्वच्छ

Web Title: Two more days of rain in the district