जाधववाडीत सांडपाणी जाण्यावरुन दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST2021-06-16T04:31:38+5:302021-06-16T04:31:38+5:30

कोल्हापूर : रिकाम्या जागेतून जाणारे सांडपाणी खरमाती टाकून बुजवल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी जाधववाडीत ...

Two families fight over sewage in Jadhavwadi | जाधववाडीत सांडपाणी जाण्यावरुन दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

जाधववाडीत सांडपाणी जाण्यावरुन दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

कोल्हापूर : रिकाम्या जागेतून जाणारे सांडपाणी खरमाती टाकून बुजवल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी जाधववाडीत मारुती मंदिरनजीक घडली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबांमधील एकूण पाचजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुभांगी सुधाकर जाधव व शकुंतला मारुती माने या दोन कुटुंबीयांमध्ये ड्रेनेजच्या पाण्यावरुन गेले काही दिवस वाद धुमसत आहे. शनिवारी याच कारणावरुन दोन्ही कुटुंबीयांमध्ये वादावादी, हाणामारी झाली. यावेळी दोन्ही कुटुंबीयांकडून हाणामारीसाठी दगड, प्लास्टिकचे पाईप, लाकडी फळीचा वापर करण्यात आला. शुभांगी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शकुंतला मारुती माने, सौरभ माने, गौरव माने यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे तर विरोधी गटातर्फे शकुंतला माने यांच्या तक्रारीनुसार सुधाकर जाधव व शुभांगी जाधव यांच्याविरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Two families fight over sewage in Jadhavwadi