पाचवी ते आठवीच्या शाळांत पुन्हा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:19+5:302021-02-05T06:56:19+5:30

शाळांमध्ये येण्यास विद्यार्थी उत्सुक आहेत. जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या १५७८ शाळा सुरू झाल्या असून, त्यामधील विद्यार्थ्यांच्या एकूण उपस्थितीचे प्रमाण ...

Twitch again in fifth to eighth grade schools | पाचवी ते आठवीच्या शाळांत पुन्हा किलबिलाट

पाचवी ते आठवीच्या शाळांत पुन्हा किलबिलाट

शाळांमध्ये येण्यास विद्यार्थी उत्सुक आहेत. जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या १५७८ शाळा सुरू झाल्या असून, त्यामधील विद्यार्थ्यांच्या एकूण उपस्थितीचे प्रमाण ८० टक्के आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणीची प्रक्रिया सुरू आहे.

-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

हमीपत्र दिलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले आहेत. बॅचनिहाय एक दिवसआड त्यांचे वर्ग भरविण्यात येणार आहेत.

-व्ही.के. शिंदे, शिक्षक, प्रायव्हेट हायस्कूल.

सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. अध्यापन सुरू केले. वर्ग सुरू झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद तर पालकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया होत्या.

- वर्षाराणी वायदंडे, मुख्याध्यापक, नूतन मराठी विद्यालय (शाखा क्रमांक एक)

शाळेत आल्याने खूप छान वाटत आहे. रोज किमान चार तास तरी वर्ग भरावेत, असे मला वाटते.

-आर्या इंगवले, विद्यार्थिनी, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी.

खूप दिवसांनी वर्गात बसल्याने मस्त वाटले. कोरोनामुळे थोडी भीती वाटत होती. पण, आज शाळेत आल्यानंतर ती दूर झाली.

- प्रसाद हेंबाडे, विद्यार्थी, गोकुळ शिरगाव.

बऱ्याच महिन्यांनी मैत्रिणी भेटल्याने बरे वाटले. प्रत्यक्षात वर्गामध्ये बसून शिक्षण घेण्याचा आनंद वाटला.

-आदिती भोसले, विद्यार्थिनी, जवाहरनगर

गेल्या सात-आठ महिन्यांपासून ऑनलाइन शिकत आहोत. आज प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने छान वाटले. अभ्यासक्रम पूर्ण व्हावा.

-आदिश पाटील, विद्यार्थी, शिवाजीपेठ

चौकट

महापालिकाच्या १११ शाळा सुरू

इयत्ता पाचवी ते आठवीच्या महापालिकेच्या १११ शाळा सुरू झाल्या. त्यातील विद्यार्थिसंख्या १६,३९८ आहे. या शाळांमधील ९१० शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे. त्यातील ८९१ शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आहेत. ८३९७ पालकांनी समंतीपत्रे दिली असल्याचे प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी सांगितले.

चौकट

काही पालकांचा नकार

कोरोनाबाबतची भीती मनात असल्याने २० टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांची संख्या अधिक आहे. शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापनाने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Twitch again in fifth to eighth grade schools