शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत ‘स्वाइन’चे वीस बळी

By admin | Updated: August 23, 2015 17:53 IST

जिल्ह्यातील परिस्थिती : १७६ पैकी ८० रुग्णांची चाचणी होकारार्थी

कोल्हापूर : स्वाइन फ्लूची साथ हळू-हळू डोके वर काढू लागली आहे. आतापर्यंत कोल्हापुरात १७६ संशयितांना स्वाइनची लागण झाल्याचा संशय म्हणून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ८० रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांच्यावर खासगी व सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत तर जानेवारी २०१५ ते २१ आॅगस्ट २०१५ अखेर २० रुग्णांचा जीव स्वाइन फ्लूने घेतला आहे. २००९ मध्ये ‘इन्फ्ल्यूंझा एच-१, एन-१’ विषाणू हा सिझनल फ्लू म्हणून सर्वत्र पसरू लागला आहे. विशेष म्हणजे हा विषाणू प्रामुख्याने नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद अशा मोठ्या गर्दीच्या शहरात मोठ्या प्रमाणात आढळून आला तर यातील काही रुग्णांचा राज्यात संचार झाल्याने याची व्याप्ती हळू-हळू वाढू लागली. मागील वर्षी अनेक जणांचे कोल्हापुरातही या रोगाने बळी घेतले. यंदा जानेवारी २०१५ पासून या रोगाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यंदा २० रुग्णांचे आजपर्यंत बळी गेले आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआरसह गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, आजरा, पन्हाळा, कोडोली, शाहूवाडी, गांधीनगर, कागल, शिरोळ, सेवा रुग्णालय कसबा बावडा, करवीर, गगनबावडा, राधानगरी आदी ठिकाणी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत. याशिवाय शहरातही महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटल, अ‍ॅपल सरस्वती, अ‍ॅस्टर आधार, सिद्धिविनायक, मोरया, स्वस्तिक, डी. वाय. पाटील, तर इचलकरंजी येथे आय.जी.एम. रुग्णालयासह ७३ प्राथमिक आरोग्य केंद्र व १६ ग्रामीण रुग्णालये आणि ४ उपजिल्हा रुग्णालयांत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, डोकेदुखी ही स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणे असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे क्रमप्राप्त असून जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन उपचार घ्यावेत. वेळेत उपचार न घेतल्यास या छोट्याशा वाटणाऱ्या लक्षणांमुळे आपला जीवही आपण गमावू शकतो. त्यामुळे वेळेत उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.