शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना बारा तास वीज

By admin | Updated: September 8, 2016 00:30 IST

आजपासून अंमलबजावणी : महावितरणला आदेश

कोल्हापूर : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने शेतीला बारा तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ९३३ कृषिपंपधारकांना त्याचा फायदा होणार आहे.जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, आॅगस्टअखेरपासून पावसाने दडी मारली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिपंपाला बारा तास वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ला वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘महावितरण’ने कार्यवाही करीत बारा तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. महावितरणकडून सध्या कोल्हापुरात आठवड्यातील तीन दिवस आठ तास वीजपुरवठा हा सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत केला जात होता. तसेच चार दिवस रात्री दहा तास वीजपुरवठा रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत करण्यात येत होता. यात क्रमवारीची पद्धत वापरली जात होती. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता बारा तास वीजपुरवठा केला जाणार आहे. यात रात्री दहा ते सकाळी दहा आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा दोन टप्प्यांमध्ये फिडरनिहाय वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना ‘महावितरण’च्या वरिष्ठ कार्यालयाकडून बुधवारी सायंकाळी कोल्हापूर परिमंडळाला प्राप्त झाली. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना फायदाबारा तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे ‘महावितरण’च्या कोल्हापूर मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) एस. बी. मारुलकर यांनी सांगितले. चांगला निर्णय जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे सेक्रेटरी मारुती पाटील म्हणाले, सध्या कृषिपंपांना आठ तास मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये पाण्याचे फेरे पूर्ण होत नव्हते. कृषिपंपांना किमान दहा तास वीजपुरवठा व्हावा, अशी आम्ही वारंवार मागणी करीत होतो.