शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘बसाल्ट क्विन’ मोहिमेसाठी राज्यातील १२ जणी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:26 IST

या मोहिमेत कोल्हापुरातील खुशी कांबोज (वय १९), पुण्यातील सौम्या जोशी (१०), गिरीजा लांडे (११), काव्या बोरोलीकर (८), तासगावमधील अरमान ...

या मोहिमेत कोल्हापुरातील खुशी कांबोज (वय १९), पुण्यातील सौम्या जोशी (१०), गिरीजा लांडे (११), काव्या बोरोलीकर (८), तासगावमधील अरमान मुजावर (२०), मुंबईतील आद्या नायर (१६), नाशिकची तनया कोळी, साताऱ्याची साक्षी प्रभुणे (१६), लोणावळ्यातील तन्वी अहेर (१२), श्रृती शिंदे (१७), ठा‌ण्यातील मायरा सकपाळ (१०), खंडाळ्यातील निशा वाघमारे (१५) सहभागी होतील. शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेच्या माध्यमातून या मुलींनी खडतर प्रशिक्षण घेतले आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुली आहेत. काहींना निवड करण्यापूर्वी गिर्यारोहणाची कल्पनाही नव्हती. क्लायबिंग प्रोजेक्ट अंतर्गत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मुली वजीर, नागफणी, संदेवन, वानरलिंगी, तैलबैला, आदी सुळके सर करणार असल्याचे विनोद कांबोज यांनी सांगितले. या पत्रकार परिषेदस प्रमोद पाटील, हृषिकेश केसकर, रोहित वर्तक, नेहा मोरे, कोपल गोयल, दीपक पवार, आनंद गावडे, अनिकेत बोकील उपस्थित होते.

सहभागी ‘बसाल्ट क्विन’ म्हणाल्या

अरमान मुजावर : या मोहिमेच्या निमित्ताने पहिल्यांदाच घरातून बाहेर पडले.

तनया कोळी : नेतृत्व कसे करायचे, निर्णय कसे घ्यायचे हे समजले.

साक्षी प्रभुणे : संघटितपणाचे महत्त्व, वेळेचे नियोजन समजले.

आद्या नायर : आत्मनिर्भर कसे व्हायचे याचे ज्ञान मिळाले.

खुशी कांबोज : आम्हा सर्वांना गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले.

सौम्या जोशी : या प्रशिक्षणामुळे धैर्य, आत्मविश्वास वाढला.

फोटो (२३०२२०२१-कोल-बसाल्ट क्विन मोहिम ०१ व ०२) : ‘बसाल्ट क्विन’ या गिर्यारोहण मोहिमेअंतर्गत सह्याद्रीतील खडतर सुळके सर करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील बारा मुली सज्ज झाल्या आहेत.