शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरीसाठी टॅ्रक्टरमधून मोटारींची वाहतूक

By admin | Updated: September 6, 2015 20:38 IST

कोरेगाव तालुका : वीजतारांवर आकडे टाकून प्रताप; दुष्काळात नांदवळ धरणातून पाण्याचा उपसा

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी एकमेव वरदान असलेल्या नांदवळ धरणातून अवैध पाण्याचा उपसा केला जात आहे. अनेक धनिक शेतकरी महावितरण व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताला धरून आकडे टाकून या धरणातून पाणीउपसा करत आहेत. यामुळे या भागातील अनेक गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. दरम्यान, विशेषत: करून रात्रीच्या सुमारास दुचाकी, ट्रॅक्टरमधून विद्युत मोटारी आणून पाणीउपसा होत आहे. सकाळी पुन्हा या मोटारी माघारी नेण्यात येत आहेत. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी प्रारंभी अत्यल्प पाऊस झाला. त्यानंतर मात्र आजपर्यंत पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचा सामना या भागाला मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. या भागातील अनेक गावांत पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तर या भागाला वरदान असलेली नांदवळ, तळहिरा, अरबवाडी, गुजरवाडी, भाडळे ही धरणे आता कोरडी पडू लागली आहेत. एका बाजूने असा पाणीप्रश्न बिकट होत असताना नांदवळमधील धरणात असलेल्या मृत पाणीसाठाही काही धनिक शेतकरी बांधकाम विभाग कर्मचारी व महावितरणला हाताशी धरून रात्रीच्या वेळी आकडे टाकून त्या पाण्याची चोरी करत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या चार-पाच वर्षांत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. सध्या असणाऱ्या पाणीसाठ्यावरच या भागातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. या धरणात असलेल्या पाणीसाठ्याबाबत लक्ष देण्याची गरज आहे. या धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना या धरणातील पाणीउपसा करण्याचा परवाना असला तरी सध्याची परस्थिती पाहता या सर्वांवरच कडक भूमिका अवलंबण्याची गरज आहे. (वार्ताहर) धरणातून रात्रीच्यावेळी पाण्याची चोरी होत आहे. दुचाकी व ट्रॅक्टरसारख्या वाहनांचा वापर विद्युत मोटारी आणण्यासाठी केला जात आहे. पाच पासून वीस अश्वशक्तीपर्यंतच्या मोटारी सुरू असतात. याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. - प्रमोद पवार, शेतकरी, नांदवळनांदवळ धरणात सध्यातरी पाणीचोरीची कोणतीही घटना घडत नाही. याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही विद्युत मोटारी पाणी उपसा करताना सापडल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करू- रामचंद्र खरात, पाटकरी, निरा उजवा कालवाचौकशी करण्याची मागणी...एका बाजूने या नांदवळ धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. उपसा करणाऱ्या धनिकांकडे एवढ्या मोठ्या क्षमतेच्या विद्युत पंपाची परवानगी व अधिकृत विजेची व्यवस्था आहे का? याबाबत जिल्हा स्तरावरूनच तपासणी होण्याची गरज आहे. तसेच रात्रीच्या सुमारास या धरणाची पाहणी केल्यास अनेक मोटारी सुरू असल्याचे दिसून येईल, अशी मागणी नांदवळ ग्रामस्थांनी केली आहे.