शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

सतीश धुमाळ, क्षीरसागर, पांगारकर यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:18 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी डॉ. विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्यासह भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांची बदली झाली. भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांना मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली.

ठळक मुद्देसतीश धुमाळ, क्षीरसागर, पांगारकर यांच्या बदल्यातहसीलदारांसह अधिकाऱ्यांचे बदली आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी डॉ. विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्यासह भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांची बदली झाली.भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांना मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली.

गुरुवारी (दि. १) मंत्रालयातून महसूल विभागाने बदल्यांचे आदेश काढले. कोल्हापूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांची सातारा येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक १६), उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांची सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक ११) म्हणून बदली झाली.

गडहिंग्लजच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांची बदली झाली असली तरी त्यांना अद्याप पद देण्यात आलेले नाही. त्यांच्या जागेवर सांगलीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक ९) बाबासाहेब वाघमोडे यांची बदली झाली. वाघमोडे यांनी यापूर्वी करवीर तहसीलदार म्हणून काम केले आहे.त्याचबरोबर यापूर्वी कोल्हापुरात काम केलेल्या उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, स्नेहल भोसले, शैलेश सूर्यवंशी, विक्रांत चव्हाण यांच्याही बदल्या झाल्या आहेत. सांगलीच्या तहसीलदार अश्विनी वरुटे यांची भुदरगडचे तहसीलदार म्हणून तर या पदावर कार्यरत असलेले अमोल कदम यांची कोरेगाव (जि. सातारा) येथे बदली झाली आहे.

गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांच्या जागी सांगलीचे तहसीलदार (सर्वसाधारण) रामलिंग चव्हाण यांची बदली झाली आहे. जावळीचे (जि. सातारा) तहसीलदार शरद पाटील यांची इचलकरंजी येथे अप्पर तहसीलदार म्हणून बदली झाली.

टॅग्स :Transferबदलीkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार