शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-ट्रॉलीतील ऊस वाहतूक बनतेय जीवघेणी !

By admin | Updated: November 28, 2014 23:43 IST

प्रशिक्षित चालकांची गरज : वाहतूक नियमांची अंमलबजावणी अपघातास आळा घालेल

घन:शाम कुंभार -यड्राव साखर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीस प्राधान्य असते; परंतु चालकांचा अतिआत्मविश्वास व अल्लडपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा अपघातात बळी जात असून, अपघाताच्या घटना सुरू आहेत. हे रोखण्यासाठी साखर कारखान्यांसह ट्रॅक्टरमालकांनी निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतूक नियंत्रण विभागाकडून होणारी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणीच अपघातास आळा घालेल, अन्यथा ‘साखरनिर्मितीचा हंगाम अपघाताचा सिझन’ असे ब्रीदवाक्य होईल. याची दक्षता घेणे सर्वांच्या हिताचे आहे.साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा एकाच वेळी जादा वापर केला जातो; परंतु यावरील चालक अप्रशिक्षित व वाहतूक नियमाबाबत अनभिज्ञ व व्यसनी असतात. यामुळे इतरांपेक्षा जादा ऊस वाहतुकीची ईर्षा असल्याने वाहनाची क्षमता व अधिकृत परवानापेक्षा जादा ऊस भरल्याने वेग मर्यादा पाळताना चुका होतात. त्याचा परिणाम अपघात होऊन नागरिकांचा हकनाक बळी जात आहे.वाहनचालकांचे एकाच फेरीत जादा ऊस वाहतूक करण्याच्या प्रयत्नात शेतामध्ये ट्रॉली अडकून पडते. शेतात अडकलेली ट्रॉली बाहेर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर किंवा क्रेनचा वापर करावा लागत असल्याने त्याच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांस सोसावा लागतो. त्याचबरोबर अशा प्रकारात वाहनांची मोडतोड झाल्यास त्याचा भुर्दंड वाहनमालकास बसतो. एकूणच चालकाकडे नसलेला पोक्तपणा व अतिआत्मविश्वास इतरांना नुकसानकारक ठरत आहे.रस्ते वाहतूक नियंत्रण विभागही याकडे लक्ष देत नसल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताहात वाहतूक विभागाकडून एखाद्या-दुसऱ्या वाहनास रिप्लेक्टर लावून सप्ताह साजरा करण्यापुरताच हा विभाग असल्याचा भास होतो.ट्रॉलीमध्ये परवाना क्षमतेपेक्षा जादा ऊस भरू नये, ट्रॅक्टरवर मोठ्याने रेडिओ अथवा गाणी लावू नयेत, वाहनचालक समजदार व प्रशिक्षित असावा, वाहनांच्या मागे रिफ्लेटर असावा, चालक निर्व्यसनी असावा, ट्रॉलीस ब्रेकची सुविधा असावी, याकरिता ट्रॅक्टरमालकासह साखर कारखान्यांनी विशेष लक्ष देणे सामाजिक हिताचे आहे. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त करावे, यामुळेच अपघाताचे प्रमाण घटणार आहे, नाही तर गोड साखर निर्माण करणारा हंगाम ‘अपघाताचा व नुकसानीचा’ असा ठपका या हंगामावर येऊ नये याची दक्षता घेणे समाजहिताचे आहे.