शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आज संप; कामकाज ठप्प होणार

By admin | Updated: September 1, 2015 22:45 IST

शाळा बंद राहणार : अधिकारी कामावर अन् कर्मचारी संपावर

कोल्हापूर : पाच दिवसांचा आठवडा करावा, रिक्त जागा भराव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा, यांसह विविध ३० मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात आज, बुधवारी शासकीय विभागातील सव्वा लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. बस आणि रेल्वे कर्मचारीवगळता सर्वच विभागांचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने शासकीय कामकाज ठप्प होणार आहे. ‘अधिकारी कामावर आणि कर्मचारी संपावर’ असे चित्र राहणार आहेत.मंगळवारी दिवसभर सर्वच कार्यालयांतील कर्मचारी अधिकाधिक कर्मचारी संपात सहभागी व्हावेत, यासाठी प्रत्यक्ष भेटून, मोबाईलवरून संपर्क साधून, एसएमएस, व्हॉटस् अ‍ॅप, मॅसेज करून आवाहन केले. शासकीय कार्यालयांतील कर्मचारी संघटनांनी संपासंबंधी जागृती केली आहे. शिक्षण, आरोग्यसह सर्वच महत्त्वाच्या विभागांचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे सार्वजनिक सेवा ठप्प होणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. शाळा सुरू मात्र शिक्षक नाहीत, असे चित्र राहणार आहे. शिक्षक संघटनांनी शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे; परंतु, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणीही संपात सहभागी होऊ नये, शाळा सुरू ठेवाव्यात, असा आदेश काढला आहेत.बँकांतील, विमा, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग या विभागांतील कर्मचारीही संपात सहभागी होणार असल्यामुळे ‘अत्यावश्यक सेवा’ही कोलमडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या बापूसाहेब कुलकर्णी यांच्या लिपिकवर्गीय संघटनेने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. लिपिकवर्गीय कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. या संपात सहभागी होणारे कर्मचारी आज, बुधवारी सकाळी दहा वाजता ‘काम बंद’ करून टाऊन हॉलमध्ये एकत्रित जमणार आहेत. त्यानंतर तेथून आपल्या विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन महानगरपालिका, बिंदू चौकमार्गे मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचा समारोप खासबाग मैदानाजवळ होणार असून, समारोपाच्या सभेत संघटनांचे अध्यक्ष, संघटनेचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. शासकीय मध्यवर्ती कर्मचारी संघनेचे पदाधिकारी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, सीपीआर येथे रात्री मध्यवर्ती संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शासनाने संपात सहभागी होऊ नका, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळा सुरू ठेवण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू राहतील. - सुभाष चौगुले,  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शाळा बंद ठेवू नये, माध्यमिक शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे आज माध्यमिक शाळा बंद राहणार नाहीत.- ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)