शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात कॉँग्रेसचे आज गोदाम खाली करा आंदोलन; जमावबंदी

By admin | Updated: May 27, 2015 01:19 IST

गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सुमारे २४ हजार क्विंटल भात गोडावूनमध्ये असल्याने यावर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आले नाही

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा काँग्रेसने ‘भात गोडावूनखाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी कठोर पावले उचलून संबंधित २२ गोडावून परिसरात जमावबंदी लागू केली आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सुमारे २४ हजार क्विंटल भात गोडावूनमध्ये असल्याने यावर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना भात विकून टाकले. याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने १९ जानेवारीला धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करतो, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, त्याची कार्यवाही अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व आमदार नीतेश राणे यांनी २७ मे रोजी कणकवली तालुक्यातील जानवली गोडावून, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी व सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गोडावून या तीन गोडावूनमध्ये ‘भात गोडावून खाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.त्यानुसार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील २२ गोडावूनच्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात १९७३चे कलम १४४ नुसार जमावबंदी लागू केली आहे. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ही जमावबंदी २७ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २८ मे रोजीपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत राहणार आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्षकाँग्रेसच्यावतीने ‘भात गोडावून खाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन प्रमुख ई. रवींद्रन यांनी आपल्या अधिकारात संबंधित गोडावून परिसरात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व आमदार नीतेश राणे कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.