शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी शिकवले वाहतुकीचे नियम आता तरी येईल का मोठ्यांना शहाणपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:36 IST

कोल्हापूर_ : शहरातील दाभोळकर कॉनर आणि सीपीआर चौकात आज वाहनधारकांना चिमुकल्यांनी हातात विविध नियमांचे फलक धरून शिकवले आणि आपणही ...

ठळक मुद्देराबविण्यात आलेला वाहतुकीची शिस्त हा उपक्रम या चिमुकल्यांच्या कृतीतून विशेष लक्ष्यवेधी ठरला

कोल्हापूर_ : शहरातील दाभोळकर कॉनर आणि सीपीआर चौकात आज वाहनधारकांना चिमुकल्यांनी हातात विविध नियमांचे फलक धरून शिकवले आणि आपणही असे वागाल का अशी विनंती करीत त्यांच्यावर विश्वास ठेवला. नियम पाळाल तर प्रवास सुखकर होईल असेही काही चिमुकल्यांनी त्यांना समोर नव्हे तर अगदी जवळ जाऊन सांगितले. त्यामुळे या चिमुकल्यांनी दिलेली शिकवण हे मोठे लोक पाळतील का त्यापासून थोडे तरी शहाणपण घेतील का? असा विश्वास त्यांना नक्कीच त्यांच्या या उपक्रमातून वाटला असेल.

येथील कै. बी. डी. पाटील विद्यालय कळंबा (व्हाईट आर्मी स्कूल ) आणि संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या व्हाईट आर्मीचे सदस्य,  विद्यालयाचे अस्मा अपराध  यांच्या संयुक्त विद्यमानाने आज कोल्हापूर येथील मुख्य चौकात पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तोंडाला रुमाल बांधत, हातात वाहतुकीच्या विविध नियमांचे फलक घेऊन केलेला हा उपक्रम कौतुकास्पद व विशेष लक्ष्यवेधी ठरला. सहभागी झालेले विद्यार्थी शौर्य तापेकर, हर्षवर्धन शेंडे,सोहम शिंदे, वेदांत हारदे, अर्जून खानविलकर, नुतन धनाल, अनन्या पोवार, दुर्वा बुचडे, आफ्रिन शेख, अंकिता लोखंडे, अनुश्री शिंदे, जुवेरीया गारदी यांनी त्यांचे शिक्षक, व्हाईट आर्मीचे सदस्य व वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने सिंग्नला थांबल्यानंतर वाहनधारकांना थेट भिडून त्यांना हातातील फलक दाखविले. त्यांना काका, मामा अशी प्रेमळ हाक मारत, आपण वाहतुकीचे नियम पाळा, प्रवास सुरक्षित करा. सिंग्नल तोडू नका. आधी पादचाऱ्यांना रस्ता द्या. वेडीवाकडी वाहने हाकू नका. हेल्मेट वापरा. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका अशा सूचना केल्या.

यावेळी त्यांनी चौकात मध्यभागी वर्तुळाकार रिंगण करून हातातील फलक दाखवित चारीबाजूच्या वाहनचालाकांनाही वाहन चालविताना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले. काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तर थेट दुचाकी, चारचाकी वाहनचालकांच्या जवळ जाऊन त्यांचे समुपदेशनही केले.शिक्षक रामदास, कांबळे, हमिदा देसाई, व्हाईट आर्मीचे जवान प्रेम पवार, प्रेम सातपुते यांनी विशेष साथ देत, या चिमुकल्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम राबविण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांचेही मार्गदर्शन लाभले.राबविण्यात आलेला वाहतुकीची शिस्त हा उपक्रम या चिमुकल्यांच्या कृतीतून विशेष लक्ष्यवेधी ठरला तसेच मोठ्यांना काहीसा शिकविण्याचा चांगला प्रयत्नही येथे झाल्याचे पहायला मिळत होते. वाढते अपघात, बेशिस्तीचा कहर यामुळे अपघात व वाहतूक विस्कळीत तर होतेच. पण अनेकांना गंभीर इजाही होते. त्यामुळे असे उपक्रम गरजेचे असून प्रत्येकांनी स्वयंमशिस्त पाळणे महत्वाची असल्याचे येथील वाहतूक नियंत्रक यांनी सांगितले.

 

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसSchoolशाळा