पट्टणकोडोलीत तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:39+5:302021-05-17T04:24:39+5:30

दरम्यान,येथील नेर्लेकर मळ्याजवळील एक महिला व अलाटवाडी येथील एक महिला अशा दोन महिलांचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला.गावामध्ये सुमारे ७० ...

Three die of corona in Pattankodoli | पट्टणकोडोलीत तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

पट्टणकोडोलीत तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

दरम्यान,येथील नेर्लेकर मळ्याजवळील एक महिला व अलाटवाडी येथील एक महिला अशा दोन महिलांचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला.गावामध्ये सुमारे ७० जणांना कोरोनाची लागण झाली असून आत्तापर्यंत सात जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

येथील एका तरुण शास्त्रीय गायकाला आठ दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेली आठ दिवस तो कोरोनाशी संघर्ष करत होता. आज सायंकाळी त्याचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. या तरुण गायकाचे अनेक ठिकाणी मोठे शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम झाले असून त्या कार्यक्रमाला हजारोंची रसिकांची उपस्थिती असायची. मात्र आज त्याच्या अशा मृत्यूने ग्रामस्थांसहित रसिकांवर शोककळा पसरली आहे.

Web Title: Three die of corona in Pattankodoli