गांजा व दारूच्या नशेत कोयता हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:13+5:302021-01-20T04:26:13+5:30

इचलकरंजी : सिगारेटसाठी पैसे न दिल्याने गांजा व दारूच्या नशेत तिघांनी कोयत्याने वार करून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ...

Three arrested for marijuana attack | गांजा व दारूच्या नशेत कोयता हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

गांजा व दारूच्या नशेत कोयता हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

इचलकरंजी : सिगारेटसाठी पैसे न दिल्याने गांजा व दारूच्या नशेत तिघांनी कोयत्याने वार करून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर या प्रकरणातील रात्री पळून गेलेल्या स्वप्निल सुनील परीट यालाही पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

विकास विश्वास साळुंखे (३१) व सुनील साळुंखे (४०, दोघे रा. कबनूर, ता. हातकणंगले) अशी जखमींची नावे आहेत, तर दत्तात्रय ब्रह्मानंद टेके (रा. मणेरे हायस्कूलजवळ) व राहुल चिदानंद धंदरगे (रा. केटकाळेनगर, कबनूर) अशी कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. सोमवारी (दि.१८) रात्री कोरोची (ता. हातकणंगले) येथे काडाप्पा मळ्यात दत्तात्रय, राहुल व अन्य एक अशा तिघांनी मद्यप्राशन व गांजाची नशा केली होती. त्याचवेळी लघुशंकेसाठी विकास व सुनील हे तेथे आले असता वरील संशयितांनी या दोघांना बोलावून सिगारेटसाठी पैसे मागितले. त्याला नकार देताच संशयितांनी दोघांवर हल्ला केला. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळीक करीत आहेत.

चौकट

धारदार शस्त्राचा स्टेटस

संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या मोबाइल स्टेटसवर धारदार शस्त्राचा फोटो ठेवून दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे समोर आले.

Web Title: Three arrested for marijuana attack