१४ पाटबंधारे दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:51 IST2020-12-11T04:51:13+5:302020-12-11T04:51:13+5:30

चंदगड मतदारसंघातील १४ पाटबंधारे दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर : राजेश पाटील चंदगड : चंदगड तालुक्यात गतवर्षी निर्माण ...

Three and a half crore sanctioned for 14 irrigation repairs | १४ पाटबंधारे दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर

१४ पाटबंधारे दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर

चंदगड मतदारसंघातील १४ पाटबंधारे दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर : राजेश पाटील

चंदगड : चंदगड तालुक्यात गतवर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत फाटकवाडी धरणाचा रिटेनिंग व्हाॅल पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी मतदारसंघातील सर्व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसंदर्भातील प्रश्नासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यातून चंदगड मतदारसंघातील कोल्हापूर पद्धतीचे एकूण १४ बंधारे दुरुस्तीसाठी सरकारकडून साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यातून पाठबंधारे विभागाची सर्व कामे केली जाणार असल्याचे मनोगत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले .

गणुचीवाडी ( ता. चंदगड) येथील बंधारा दुरुस्ती कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते दुरुस्ती कामाचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविक अशोक आर्दाळकर यांनी केले.

या कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा माने, उपअभियंता बाबूराव पाटोळे, शाखा अभियंता तुषार पवार, पांडुरंग अर्जुनवाडकर, अडकूरचे कालवा निरीक्षक रणजित गरुड, गडहिंग्लज बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, गणुचीवाडी सरपंच शोभा भादवणकर, अडकूर सरपंच यशोधा कांबळे, आनंदा आर्दाळकर व सरपंच शोभा भादवणकर उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंद सावंत, विष्णू पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप भेकणे यांनी केले. अभय देसाई यांनी आभार मानले.

फोटो ओळी:--

अडकूर-गणुचीवाडी (ता. चंदगड) येथील बंधारा दुरुस्ती कामाचा प्रारंभ करताना आमदार राजेश पाटील. यावेळी कार्यकारी अभियंता सीमा माने, पाटोळे, कदम, अर्जुनवाडकर उपस्थित होते.

Web Title: Three and a half crore sanctioned for 14 irrigation repairs