शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

कपौंडची भिंत पाडल्याचा जाब विचारणाऱ्यालाच ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:23 IST

कोल्हापूर : प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून त्यातून पायवाटेसाठी रस्ता केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या जागामालकास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा ...

ठळक मुद्देकपौंडची भिंत पाडल्याचा जाब विचारणाऱ्यालाच ठार मारण्याची धमकीसातजणांवर गुन्हा : मोतीनगरातील कंजारभाट वसाहतीतील प्रकार

कोल्हापूर : प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून त्यातून पायवाटेसाठी रस्ता केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या जागामालकास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार मोरेवाडी रोडवर कंजारभाट वसाहत, मोतीनगरमध्ये घडला. याबाबत मोतीनगरातील सातजणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विशाल माटुंगे, कविता माटुंगे, राजू माटुंगे, अमित माटुंगे, सुमित माटुंगे, कार्तिक माटुंगे, मनोज माटुंगे (सर्व रा. कंजारभाट वसाहत, मोतीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. अनुष्का कौस्तुभ वाईकर (रा. प्लॉट नं. ५०, अरुणोदय सोसायटी, राजेंद्रनगर) यांच्या मालकीचा शांतिनिकेतन रस्त्यावर रेव्हेन्यू कॉलनीत प्लॉट आहे. या प्लॉटच्या मागे माटुंगे हे राहण्यास आहेत. माटुंगे यांनी आपल्या घराकडे ये-जा करण्यासाठी वाईकर यांच्या प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून पाऊलवाट केली आहे.

याबाबत डॉ. वाईकर व त्यांचे पती हे माटुंगे यांना जाब विचारण्यासाठी गेले, त्यावेळी माटुंगेसह सातजणांनी वाईकर दाम्पत्याला शिवीगाळ करत, आम्ही येथून जाणारच; तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्ही येथे कसे घर बांधता ते बघतो, असे म्हणून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत डॉ. वाईकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सातजणांविरुद्ध तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर