शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या बंधनापुढे शब्दही थिटे..!

By admin | Updated: February 13, 2015 23:59 IST

मूकबधिर दाम्पत्य : प्रेमविवाह करून दिली साथ

विश्वास पाटील -कोल्हापूर
पहिलीपासून दहावीपर्यंत दोघेही वि. म. लोहिया मूकबधिर शाळेचे विद्यार्थी... शाळेत असतानाही त्यांना एकमेकांबद्दल कमालीची ओढ. त्यामुळे त्यांनी ठरविले आणि आयुष्यभराचे साथीदार झाले. त्यांच्या लग्नाला अकरा वर्षे झाली, अगदी आनंदात त्यांचा संसार सुरू आहे. दोघेही मूकबधिर. एकमेकांशी हाताने खाणाखुणा करूनच त्यांचा संवाद होतो. पण त्यांचे परस्परांवरील प्रेमाचे बंधन इतके घट्ट आहे की तिथे शब्दही थिटे पडावेत. गौरी आणि अतुल सूर्यकांत भाळवणे असे या दांपत्याचे नाव.
अतुलचे कुटुंबीय शाहूपुरीच्या चौथी गल्लीत राहणारे; तर गौरी भाळवणे लग्नापूर्वीची गौरी चोडणकर. रेल्वे फाटकाजवळ राहणारी. दोघांचीही कौटुंबिक स्थिती जेमतेमच. दोघेही भिन्न जातींतील; परंतु त्यांच्या लग्नात यातील काहीच आड आले नाही. दहावीपर्यंत ते शिकले. अतुलने धडपड करून नोकरी मिळविली. सध्या तो कंत्राटी शिपाई म्हणून काम करतो. गौरी घरीच असते; परंतु ती नुसते घरकाम करून बसणारी मुलगी नाही. कुटुंबाला चार पैशांचा आधार व्हावा म्हणून तिने साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही मूकबधिर; परंतु तरीही ते सुरतला जातात व एकदम साड्या खरेदी करतात. ती ओळखीच्या महिलांना घरोघरी जाऊन साड्या विकते. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा ओम दुसरीत तर मुलगी सिद्धी पाचवीत शिकते. निसर्गाचा न्याय बघा. दोन्ही मुले सर्वसामान्य आहेत. म्हणजे बडबडी. त्याचाही आनंद या दाम्पत्यास आहे.
सगळी सुखे व श्रीमंती पायांशी लोळत असूनही किरकोळ कारणांसाठी मानसिक त्रास करून घेणारी व छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आत्महत्येच्या मार्गाने जाणारी कुटुंबे पाहिली की अतुल-गौरी यांच्या जगण्याचे मोठेपण लक्षात येते. दोघांनाही एकही शब्द बोलता येत नाही. जे काही असेल ते एकमेकांना हातवारे करूनच ते सांगतात; परंतु म्हणून त्या वाचून त्यांचे काहीच अडलेले नाही.
अतुल चांगला मुलगा आहे, त्याची कामात चांगली प्रगती आहे; म्हणून मी त्याच्याशी लग्न केले, असे गौरीने सांगितले. तो तुझ्याबरोबर भांडतो का? असे विचारल्यावर तिला जाम हसू आले... बोटाने हावभाव करीत तिने थोडा... थोडा भांडतो, असे सांगितले.
हे दोघेही कोल्हापूर जिल्हा मूकबधिर असोसिएशनचे कार्यकर्ते आहेत. कोल्हापुरातील पन्नासहून अधिक मूकबधिर मुले-मुली आठवड्यातून एक दिवस एकत्र जमतात. एकमेकांच्या अडीअडचणी सोडवितात. पती-पत्नीतील एक मूकबधिर व दुसरा सामान्य असल्यास विवाह जास्त दिवस टिकत नाही. उलट दोघेही मूकबधिर असल्यास एकमेकांना जास्त चांगले समजून घेतात, असे निरीक्षण असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर यांनी नोंदविले.