शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या वाटेत काटे... सीपीआरमध्ये दाखल्यासाठी हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काेरोनामुळे सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने दिव्यांग दाखल्यासाठी तब्बल ६ हजार अर्जांचा ढीग पडला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काेरोनामुळे सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने दिव्यांग दाखल्यासाठी तब्बल ६ हजार अर्जांचा ढीग पडला आहे. आता कोरोना साथ आटोक्यात आली असली तरी अजून दाखले देण्यास सुरुवात झाली नसल्याने दिव्यांगांचे हेलपाटे सुरु आहेत. कोविडचे कारण पुढे करून दिव्यांगांचे दाखले देण्याचे काम कोणी लांबणीवर टाकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी दिले असून, त्या आदेशालाही सीपीआर प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून सीपीआरमधील दिव्यांगांना दाखले देण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. आता कोरोना ओसरल्यानंतर व्यवहारही पूर्ववत झाले आहेत. शैक्षणिक सत्रही पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे दाखले मिळावेत म्हणून दिव्यांग सीपीआरमध्ये हेलपाटे मारत आहेत. दहावी व बारावी परीक्षेसाठी अर्ज भरतानाच एक तासाच्या जादा वेळेबरोबरच रायटरची सुविधा घ्यायची असेल तर सीपीआरमधील अधिष्ठातांची सही असलेला दाखलाच गृहित धरला जातो. पण सध्या हे दाखले देणेच बंद असल्याने आणि साधारण ऑक्टोबर, नाेव्हेंबरमध्ये अर्ज भरावे लागत असल्याने दाखला वेळेत मिळाला नाही तर काय, अशी चिंता दिव्यांगांच्या पालकांना सतावत आहे. केंद्र सुरु आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते रोज चकरा मारत आहेत.

दर बुधवारीच सोय...

सीअीपारमध्ये फक्त बुधवारीच दाखले दिले जातात. त्यामध्ये आर्थोचे ५०, डोळ्यांचे १५, कानाचे १५, मतिमंदत्वाचे १५ यासह २१ प्रकारच्या दिव्यांगत्वासाठीचे दाखले दिले जातात. दिव्यांगाला दाखला मिळवण्यासाठी किमान तीनवेळा हेलपाटे मारावेच लागतात.

चौकट

निर्णय झाला पण अंमलबजावणी नाही

दिव्यांगाना दाखले देण्याच्या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच त्यांच्या सोयीसाठी म्हणून सीपीआरव्यतिरिक्त अन्य सरकारी रुग्णालयात दाखले देण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी, असा शासन निर्णय १४ सप्टेंबर २०१८ला झाला. यानुसार सीपीआरसह शहरातील सावित्रीबाई फुले, पंचगंगा आणि सेवा रुग्णालय तर ग्रामीण भागात गडहिंग्लजसह सर्वच ग्रामीण रुग्णालयांत दाखले देण्याची व्यवस्था व्हायला हवी होती. पण त्याची अंमलबजावणी आजअखेर झालेली नाही. त्यामुळे सीपीआरमध्येच दाखल्यांसाठी झुंबड उडत असल्याचे दिसत आहे.

चौकट

सही कोणाची

सीपीआरमध्ये दिव्यांगाना दाखले देण्यासाठी अंतिम सही अधिष्ठातांची लागते. त्यांच्या सहीशिवाय दाखला गृहित धरला जात नाही, पण गेल्या काही महिन्यांपासून अधिष्ठातांच्या बदलीचा विषय गाजत आहे. वर्षभरात पाच-सहाजण येथे बदली होऊन आले आणि गेले. आता अधिष्ठाता अजित मोरे यांचीदेखील बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर दीक्षित आले आहेत, पण त्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही. सहीत बदल केलेला नसल्याने दाखले देता येत नाहीत.

प्रतिक्रिया

कोरोनामुळे १५ मेपासून दाखले देण्याचे केंद्र बंद करण्यात आले होते. अजून पुढील आदेश नसले तरी पुढील महिन्यात १० तारखेपासू्न दाखले देण्यास सुरुवात करण्याचे नियोजन सुरु आहे.

- विकास चौगुले,

ऑनलाईन दाखले कक्षप्रमुख, सीपीआर, कोल्हापूर.

प्रतिक्रिया

दिव्यांगाना दाखले देण्याची केंद्र वाढवा, अशी वारंवार मागणी करुनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दाखल्यासाठी लांबवरुन यावे लागत आहे. ऑनलाईन नोंद झाल्यानंतर तारीख घेण्यासाठी आणि पुन्हा तपासणीसाठी यावे लागते. यात मोठी अडचण आहे. पुण्यात दाखले द्यायला सुरुवात झाली असताना कोल्हापुरात काय अडचण ते समजत नाही.

- स्वाती गोखले,

समन्वयक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कोल्हापूर.