चोरट्याने चोरले चिरमुरे, चॉकलेट, घड्याळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:01+5:302021-09-15T04:30:01+5:30

कोल्हापूर : येथील सुभाषनगरातील पान शॉपचे शटर उचकटून चोरट्याने आतील एक पोते चिरमुरे, घड्याळ, गोळ्या चॉकलेट असा सुमारे सव्वा ...

Thieves stole crackers, chocolates, watches | चोरट्याने चोरले चिरमुरे, चॉकलेट, घड्याळे

चोरट्याने चोरले चिरमुरे, चॉकलेट, घड्याळे

कोल्हापूर : येथील सुभाषनगरातील पान शॉपचे शटर उचकटून चोरट्याने आतील एक पोते चिरमुरे, घड्याळ, गोळ्या चॉकलेट असा सुमारे सव्वा नऊ हजाराचा माल चोरला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या चोरीची तक्रार पान शॉपमालक आकाश कुबेर शिंदे (रा. भारतनगर, साळोखेपार्क) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.

येथील सुभाषनगरातील संत रोहिदास भाजी मार्केटनजीक आकाश शिंदे यांचे पान शॉप आहे. रविवारी रात्री त्यांनी ते नेहमीप्रमाणे बंद केेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या पान शॉपच्या शटरचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. आतील मनगटी घड्याळे, घड्याळांचे साहित्य, चिरमुरे एक पोते, गोळ्या-बिस्किटच्या बरण्या असा सुमारे सव्वा नऊ हजार रुपयेचा मुद्देमाल चोरुन नेला. सोमवारी सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी चोरीची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्या नोंदवली आहे. पोलीस चोरट्या्चा शोध घेत आहेत.

Web Title: Thieves stole crackers, chocolates, watches