मंगलाष्टका सुरू होताच नववधूंचे ११ तोळ्यांचे दागिने लंपास, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:58 IST2025-11-25T12:56:45+5:302025-11-25T12:58:26+5:30
दागिन्यांची पर्स पायात ठेवली. मंगलाष्टका झाल्यावर पायाजवळची पर्स गायब झाली

मंगलाष्टका सुरू होताच नववधूंचे ११ तोळ्यांचे दागिने लंपास, कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : ताराबाई पार्कातील एक हॉल आणि नागाळा पार्कातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या लॉनमध्ये लग्नाच्या मंगलाष्टका सुरू असतानाच चोरट्यांनी नवरीच्या दागिन्यांची पर्स लंपास केली. दोन्ही घटनांमध्ये ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने, तीन मोबाइल आणि ८० हजारांची रोकड असा सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार रविवारी (दि. २३) सकाळी आणि दुपारी घडला.
फिर्यादी मेघा अतुल दीक्षित (वय ५८, रा. कोल्हापूर) या प्राध्यापिका आहेत. लग्नात मुलीला द्यायचे सुमारे साडेनऊ तोळ्यांचे दागिने त्यांनी एका पर्समध्ये ठेवले होते. मंगलाष्टका सुरू होण्यापूर्वी त्या दागिन्यांची पर्स घेऊन स्टेजवर खुर्चीत बसल्या होत्या. दागिन्यांची पर्स पायात ठेवली होती. मंगलाष्टका झाल्यावर पायाजवळची पर्स गायब झाली.
पुण्यातील कसबा पेठमध्ये राहणारे शरदचंद्र कमलाकर वडके (वय ५९) यांच्या मुलीचे लग्न रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ लॉन येथे होते. मुलीला लग्नात घालण्यासाठी तयार केलेले दागिने पर्समध्ये ठेवले होते. शिवाय ८० हजारांची रोकड व मोबाईल असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल होता. दुपारी मंगलाष्टका संपताच दागिन्यांच्या पर्सची चोरी झाल्याचे लक्षात आले.