Kolhapur: नांगनूरमध्ये सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले, चोरट्यांनी १५ तोळे दागिन्यासह रोकड लांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:30 IST2025-06-10T13:30:25+5:302025-06-10T13:30:45+5:30

तपासासाठी कोल्हापूरहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे

Thieves broke into the house of a retired policeman in Nanganur Kolhapur and looted 15 tolas of jewelry and cash | Kolhapur: नांगनूरमध्ये सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले, चोरट्यांनी १५ तोळे दागिन्यासह रोकड लांबवली

Kolhapur: नांगनूरमध्ये सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले, चोरट्यांनी १५ तोळे दागिन्यासह रोकड लांबवली

राम मगदूम 

गडहिंग्लज : ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या सेवानिवृत्त पोलिसाचे घर अज्ञात चोरट्याने फोडले. लोखंडी तिजोरी ठेवलेले सुमारे १५ तोळ्यांचे दागिने व वीस हजाराची रोकड लांबवली. नांगनूर ( ता. गडहिंग्लज) येथील या घटनेमुळे तालुक्याच्या पूर्व भागात खळबळ उडाली.

मिळालेली माहिती अशी, नागनूर येथील नाना निंगाप्पा बामणे हे मुंबई पोलीस दलाच्या सेवेत होते. सेवानिवृत्तीनंतर ही ते मुंबई येथेच वास्तव्याला असून त्यांना दोन मुली आहेत. एकीचा विवाह झाला असून दुसरी मुंबई येथे नोकरी करते. अलिकडेच त्यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या समोर नवीन घर बांधले आहे. मे महिन्यात झालेल्या श्री. बसवाण्णा देवाच्या यात्रेसाठी पत्नी नंदा यांच्यासह ते गावी आले होते.

दरम्यान, सोमवारी (९) हर्नियाच्या ऑपरेशनसाठी ते येथील एका खासगी दवाखान्यात दाखल झाले आहेत.त्यामुळे घरी कुणीही नव्हते. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लोखंडी गज उचकटून घरात प्रवेश केला. तिजोरीत ठेवलेले सुमारे १५ तोळ्यांचे दागिने, चांदीच्या वस्तू, व २० हजाराची रोकड लंपास केली.

घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर, उपनिरीक्षक विजय घाटगे, पोलिस पाटील ज्ञानदेव मोकाशी यांनी भेट दिली. बामणे यांच्या पत्नी नंदा यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत चोरीची नोंद झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासासाठी कोल्हापूरहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे.

खिडकीचे लोखंडी गज उचकटले 

मंगळवारी सकाळी शेजारच्या नागरिकांना बामणे यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज उचकटलेले निदर्शनास आले.त्यांच्याकडुन माहिती मिळताच नंदा यांनी घराकडे धाव घेतली.कुलूप काढून घराचा दरवाजा उघडल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले.

Web Title: Thieves broke into the house of a retired policeman in Nanganur Kolhapur and looted 15 tolas of jewelry and cash