शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्याच्या पाण्यावर दाट हिरवा तवंग; उग्र दर्प

By admin | Updated: March 11, 2015 00:31 IST

तलावाच्या सभोवतालमधून मिसळणारे सांडपाणी, तलावात धुतली जाणारी जनावरे व कपडे हेही घटक रंकाळ्याच्या प्रदूषणाला कारणीभूत

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणामुळे अखेरची घटका मोजत असताना कोल्हापूरचे वैभव समजल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाची वाटचाल आता पंचगंगा नदीच्या दिशेने सुरू आहे. रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी, ब्लू ग्रीन वनस्पती आणि तलावामध्ये धुतले जाणारे कपडे, जनावरे हेही प्रदूषणाला कारणीभूत घटक आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.सध्या रंकाळा तलावाच्या पाण्यावर हिरवट तवंग आला आहे. हा तवंग ‘ब्लू ग्रीन अल्गी’ या वनस्पतीमुळे आला आहे. त्याचबरोबर पाण्यालाही गेल्या दोन-तीन दिवसांपासून दुर्गंधी आली आहे. हा दर्प या परिसरात पसरला आहे. तसेच तलावाच्या सभोवतालमधून मिसळणारे सांडपाणी, तलावात धुतली जाणारी जनावरे व कपडे हेही घटक रंकाळ्याच्या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे नागरिकांनी सांगितले.आवाहनाकडे दुर्लक्षमहापालिका प्रशासनाने रंकाळा तलावात कोणीही कपडे, जनावरे धुऊ नयेत, असे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते; पण या आवाहनाला न जुमानता नागरिक रंकाळा तलावात आजही कपडे व जनावरे राजरोसपणे धुवत असल्याचे चित्र दिसते.महापालिकेचा दावारंकाळा तलावात परिसरातील सांडपाणी मिसळू नये यासाठी रंकाळा तांबट कमान ते दुधाळी नाल्यापर्यंंत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सांडपाणी या ड्रेनेज लाईनमधून जाते. रंकाळा तलावात अतिशय कमी सांडपाणी मिसळत असल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी योजनेमधून गतवर्षी रंकाळा संवर्धन योजनेसाठी ६५ कोटी रुपयांचा निधी आला. त्यामधून रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाण्याचे नाले वळविले. हे सांडपाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यात आले. त्यासाठी यामधील निधी खर्च केला. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात निधी मिळण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावित निधीमधून संपूर्ण रंकाळा तलावामधील गाळ काढण्याची प्रक्रिया होणार आहे.- आर. के.पाटील, अभियंता, पर्यावरण प्रमुख, महापालिका